Download App

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, विश्वासू सहकाऱ्याला पाठवलं भारतात; काय घडलं?

US Ambassador to India : भारताबरोबर सुरू असलेल्या टॅरिफ वॉर दरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी असलेल्या सर्जियो गोर यांना भारतात अमेरिकेचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त केले आहे. याचबरोबर गोर यांना साउथ अँड मिडल ईस्ट आशिया देशांतील प्रकरणांच्या बाबतीत विशेष दूत म्हणूनही जबाबदारी दिली आहे. ट्रम्प सरकारकडून भारतावर आकारण्यात आलेल्या 50 टक्के टॅरिफ करानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाची माहिती ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडियावरून दिली. मला ही घोषणा करताना आनंद होत आहे की मी सर्जियो गोर यांना भारतात अमेरिकी राजदूत म्हणून नियुक्त करत आहे. याचबरोबक मध्य आशियाई प्रकरणांच्या बाबतीतही त्यांना विशेष दूत म्हणून जबाबदारी देत आहे. सर्जियो आणि त्यांच्या टीमने रेकॉर्ड वेळेत सरकारी फेडरल विभागातील चार हजारांहून अधिक अमेरिका फर्स्ट पॅट्रियट्सच्या नियुक्त्या केल्या आहेत. अमेरिकेला पुढे घेऊन जाण्याच्या आणि पुन्हा महान बनवण्याच्या माझ्या अजेंड्याला सर्जियो पुढे घेऊन जातील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

चूक एकाची, शिक्षा मात्र सगळ्यांना! अमेरिकेत परदेशी ट्रक ड्रायव्हर्सच्या व्हिसावर बंदी; भारतीय ड्रायव्हरच्या चुकीनंतर मोठा निर्णय

सर्जियो गोर ट्रम्प यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी ट्रम्प ज्यूनियर यांच्यासोबत त्यांनी Winning Team Publishing ची सहस्थापना केली होती. या अंतर्गत ट्रम्प यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले होते. याव्यतिरिक्त त्यांनी ट्रम्प यांच्या अभियानांना समर्थन देणाऱ्या सर्वात मोठ्या सुपर पीएसीमधील एकाचे संचालनही केले होते. यानंतर ट्रम्प यांनी त्यांना भारतात राजदूत म्हणून नियुक्ती देत मोठा डाव टाकला आहे.

सर्जियो गोर यांची भारतातील राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्य आधी एरिक गार्सेटी यांनी 11 मे 2023 ते 20 जानेवारी 2025 या काळात भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून काम पाहिले. गार्सेटी यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अमेरिकी दुतावासाचे नेतृत्व जॉर्गन के. अँड्र्यूज करत होते. त्यांनी 20 जानेवारी 2025 रोजी कार्यभार स्वीकारला होता. आता त्यांच्या जागी गोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीला अद्याप सिनेटची मंजुरी मिळणे बाकी आहे.

भारताच्या निवडणुकीत USAIDचा निधी नाही, अमेरिकन दूतावासाने फेटाळला ट्रम्प यांचा दावा

follow us