US Shooting : अमेरिकेतून पुन्हा एकदा गोळीबाराची थरारक घटना (US Shooting) घडली आहे. नवीन वर्षाची सुट्टी संपल्यानंतर शाळा सुरू झाल्या होत्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील आयोवा शहरातील एका विद्यालयात आज सकाळी झालेल्या गोळीबारात एका जणाचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले. इतकेच नाही तर संशयित शूटरने स्वतःवरही गोळी झाडली. यात त्याचा मृत्यू झाला. आयोवा शहरातील पेरी हायस्कूलमध्ये गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली.
Prague Shooting : धक्कादायक! ‘प्राग’मध्ये अंदाधुंद गोळीबार; हल्लेखोरासह 15 ठार, 30 जखमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतरा वर्षीय संशयिताने केलेल्या गोळीबारात सहावीत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. गोळीबार करणारा आरोपी देखील याच शाळेतील होता असे आता तपासातून समोर आले आहे. हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे. कदाचित त्याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. अमेरिकेत गोळीबाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
दरम्यान, याआधी झेक प्रजासत्ताक येथील प्राग विद्यापीठात झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 15 लोकांचा मृत्यू झाला. 24 वर्षीय हल्लेखोराने प्राग विद्यापीठात अंदाधुंद गोळीबार केला. त्याच्या या गोळीबारात जवळपास 15 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. तर 30 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. या घटनेतील हल्लेखोरही मारला गेला होता.