Strait of Hormuz : नुकतंच झालेल्या शांतता करारानंतर अमेरिका आणि इराण दरम्यान पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची शक्यता आहे. याचा मुख्य कारण म्हणजे अमेरिकाने गेल्या 24 तासांत दुसऱ्यांदा इराणवर मोठा हल्ला केला आहे. अमेरिकेच्या या कारवाईनंतर दोन्ही देशांमधील शांतता करार धोक्यात आहे. माहितीनुसार, अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये एका जहाजावर हल्ला केल्यानंतर आता इराणच्या लष्करी तळांना टार्गेट केले आहे.
अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’ने दिलेल्या माहितीनुसार, हे हल्ले डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या आदेशानुसार करण्यात आले आहे. इराणने (Iran) युद्धविरामाच्या अटींचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचा दावा अमेरिकेकडून (America) करण्यात आहे. इराणने युद्धविराम असून देखील पनामाचा ध्वज असलेल्या एका जहाजावर ड्रोन हल्ला केला असल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात येत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला धमकी दिली आहे. जर इराणने नियमांचे पालन केले नाही तर अमेरिका मोठी लष्करी मोहीम हाती घेईल ज्यामुळे इराणला मोठा नुकसान सहन करावा लागेल अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. माहितीनुसार, अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ (Strait of Hormuz) असलेल्या सिरिक बेटाच्या परिसरात हल्ले केले आहे.
ट्रम्प यांनी टृुथ सोशलवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिकन विमाने कोणत्याही क्षणी इराणचे क्षेपणस्त्र आणि ड्रोन साठवणूक केंद्र नष्ट करु शकतात. इराणने युद्धविरामाचे उल्लंघन केल्यास नुकसान होणार. असे वाटते की ते कधीच धडा घेणार नाही. जर हे असेच चालू राहिले तर एक दिवस असा येईल जेव्हा आम्हाला लष्करी कारवाई करण्यास भाग पाडले जाईल आणि याचा परिणाम इराणच्या अंतामध्ये होईल असं ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘या’ राशींना होणार फायदा, मिळणार नशिबाची साथ ; सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा राहणार?-
24 तासांत दुसऱ्यांदा हल्ला
माहितीनुसार, अमेरिकेने 24 तासांत दोन मोठे हल्ले इराण केले आहे. दुसऱ्या हल्ल्यात अमेरिकेने इराणची ड्रोन आणि क्षेपणास्त्र साठवणूक केंद्रे तसेच रडार यंत्रणांना लक्ष्य करण्यात आले. तर दुसरीकडे आता इराणने देखील प्रतिक्रिया देत जर अमेरिकेने हल्ला केल्यास त इराण शांत बसणार नाही चोख प्रत्युत्तर देणार असं म्हटले आहे.
