Download App

Video : ट्रम्प अन् झेलेन्स्कींमधील ऑन कॅमेरा फाईट मिस झालीये?; ‘हे’ 10 मुद्दे तुम्हाला सर्वकाही सांगतील…

या शाब्दिक चकामकीदरम्यान ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना स्टुपिड राष्ट्राध्यक्ष म्हटल्याचेही दिसून येत आहे.

  • Written By: Last Updated:

Donald Trump And Oolodymyr Zelensky Fight What Happened In White House :  युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये ऑन कॅमेरा शाब्दिक चकामक उडाली. धक्कादायक बाब म्हणजे या शाब्दिक चकामकीदरम्यान ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना स्टुपिड राष्ट्राध्यक्ष म्हटल्याचेही दिसून येत आहे. सध्या दोन्ही नेत्यांमध्ये घटलेल्या बाचाबाचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, ज्यांनी कुणी ही शाब्दिक चकामक मिस केली असेल आणि नेमकं काय झालं हे समजून घ्यायचं असेल तर हे 10 मुद्दे खास तुमच्यासाठी…

50 लाख डॉलर्स द्या अन् अमेरिकचे नागरिक व्हा…डोनाल्ड ट्रम्पची ‘खास’ योजना

झेलेन्स्की व्हाईट हाऊसमध्ये का गेले होते?

ट्रम्प यांच्याशी रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा करण्यासाठी झेलेन्स्की व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले होते. पण दोन्ही नेत्यांमध्ये असे काहीतरी घडले जे इतिहास कधीही विसरणार नाही. दोन्ही नेत्यांमधील भेटीची सुरुवात निश्चितच औपचारिक भेटीने झाली पण ती अपेक्षेप्रमाणे संपली नाही. ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात साध्या संभाषणापासून सुरू झालेले संभाषण गरमागरम वादविवादात रूपांतरित झाले. जेव्हा दोघांमधील वाद वाढला तेव्हा अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी आपला सूर कठोर करत झेलेन्स्की यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु झेलेन्स्की काही केल्या थांबण्यास तयार नसल्याचे दिसून आले.

अमेरिकेने युक्रेनला धक्का दिलाच! संयुक्त राष्ट्रांत चक्क रशियाला साथ; नेमकं काय घडलं?

1. जेव्हा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी आले तेव्हा संपूर्ण जगाला अशी अपेक्षा होती की, ते आपली भूमिका सोडून युद्ध संपवण्याच्या दिशेने वाटचाल करतील, परंतु घडले उलटेच. कॅमेऱ्यासमोर दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

2. जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशिया-युक्रेन युद्धाच्या सध्याच्या परिस्थितीवर चर्चा सुरू केली, तेव्हा ट्रम्प यांनी झेलेन्स्कीला मोठ्या आणि कडक आवाजात सांगितले की, “एकतर तुम्ही करार करा किंवा आम्ही बाहेर पडू.” असे सांगितले.

3. एवढेच नव्हे तर, ट्रम्प यांनी झेलेन्स्कीला सांगितले की, “तुम्ही मोठ्या संकटात आहात, तुम्ही युद्ध जिंकत नाही आहात.” त्यावर “आम्ही आमच्या देशात आहोत आणि मजबूत उभे आहोत. तसेच तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे आभार देखील मानले असल्याचे झेलेन्स्की यांनी सांगितले.

4. युक्रेनमध्ये शांतता कराराला होत असलेला उशीर लक्षात घेता ट्रम्प म्हणाले की, “मला भीती वाटते की, अशा प्रकारे व्यवहार केल्याने गोष्टी खूप कठीण होतील. तुम्ही लाखो लोकांच्या जीवाशी जुगार खेळत असून, जे करत आहात ते युक्रेनसाठी खूप अपमानजनक आहे.”

5. ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील चर्चेत अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स देखील सामील झाले. जेव्हा झेलेन्स्की यांनी जेडी व्हान्स यांना मोठ्याने बोलू नये असे सांगितले तेव्हा व्हॅन्सने कडक भूमिका घेत युद्ध संपवण्यासाठी राजनीतिकता आवश्यक असल्याचे झेलेन्स्की यांना सांगितले. त्यावर झेलेन्स्की यांनी कोणती राजनयिकता?” असा प्रतिप्रश्न केला. त्यानंतर व्हॅन्स यांनी राष्ट्राध्यक्ष पदाचा अनादर केल्याचा आरोप केला.

जमिनीचा ताबा, हजारोंचा मृत्यू अन् युक्रेनची कोंडी; 3 वर्षांच्या यु्द्धाचा कटू हिशोब

6. त्यानंतर झेलेन्स्की यांच्यावर हल्ला चढवत ट्रम्प म्हणाले की, “आम्ही तुम्हाला 350 अब्ज डॉलर्स, लष्करी उपकरणे आणि भरपूर पाठिंबा दिला आहे. जर तुमच्याकडे आमची लष्करी उपकरणे नसती तर, हे युद्ध दोन आठवड्यात संपले असते.”

7. ट्रम्प यांच्या या विधानावर झेलेन्स्की यांनी तुम्ही पुतिन यांच्यासारखेच शब्द वापरल्याचा प्रतिवार करत मदत नसती तर, युद्धात युक्रेन दोन ते तीन दिवसही टिकू शकले नसते हे विधान मी पुतिन यांच्याकडून ऐकले असल्याचे सांगितले. झेलेन्स्कीचे हे शब्द ऐकून ट्रम्प आश्चर्यचकित झाले आणि अशा प्रकारे काम करणे खूप कठीण जाईल असे म्हटले.

8. ट्रम्प यांच्याशी झालेल्या जोरदार वादविवादानंतर झेलेन्स्की व्हाईट हाऊसमधून निघून गेले. पण ज्यावेळी चर्चा करण्यासाठी झेलेन्स्की व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले होते. तेव्हा ट्रम्प यांनी झेलेन्सेकी यांचे स्वागत केले, पण वादविवादानंतर ट्रम्प झेलेन्सेकींना निरोप देण्यासाठीही गेले नाहीत. दोन्ही नेत्यांमधील वादानंतर जगातील अनेक देशांनी, विशेषतः युरोपीय देशांनी, झेलेन्स्की आणि युक्रेनला पाठिंबा दिला आहे.

9.
बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर झेलेन्स्की यांच्यावर टीका केली आणि ते शांततेसाठी तयार नसल्याचे म्हणत त्यांनी झेलेन्स्कीवर अमेरिकेचा अपमान केल्याचा आरोपही केला आहे.

10. तर, दुसरकडे झेलेन्स्की यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत घडलेल्या प्रकारानंतर मी कोणाचीही माफी मागणार नसून जे काही घडले ते दोन्ही देशांसाठी चांगले नसल्याचे म्हटले आहे.

follow us