Download App

Achalpur Market Committee : अडत्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक! पणन कायद्याचे उल्लंघन, धान्य खरेदीच्या हिशोबपट्टीतही घोळ

  • Written By: Last Updated:

Achalpur Market Committee : शेतमालाच्या विक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक होण्यापासून वाचवण्याचे काम बाजार समित्या (Market Committees) करत असल्याचे नेहमीच बोलले जाते. मात्र, बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खासगी वजनकाटा यामध्ये 10 किलोचा तफावत असल्याचे समोर आलं होतं. आता अमरावती जिल्ह्यातील अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Achalpur Agricultural Produce Market Committee) शेतकऱ्यांकडून ठरलेल्या नियमापेक्षा जास्त वसुली होत असल्याचा आरोप बाजार समितीचे नवनियुक्त संचालक पोपट घोडेराव (Popat Ghoderao) यांनी केला. (Violation of Marketing Act in Achalpur Agricultural Produce Market Committee)

परतवाडा अमरावती शहरानंतर जिल्ह्यात सर्वाधिक शेतीमालाची आवक असणाऱ्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्यमाल अडत्यांना विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या हिशेबपट्टीत मोठ्या प्रमाणात तफावत असून कृषी उत्पन्न बाजारसमितीत पणन नियमाचे उल्लंघन केल्या जात आहे. या सर्व हिशेब पट्टीची योग्य ती चौकशी करुन फौजदारी कारवाई करत गुन्हे दाखल करण्याची मागणी घोडेराव यांनी सभापतींना केली आहे.

Ravi Ashwin Stats: अश्विनने रचला इतिहास, कसोटी क्रमवारीत ‘हा’ करिष्मा करणारा पहिला भारतीय गोलंदाज

अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य विकल्यानंतर अडत्यांनी धान्य खरेदी करत असल्याचे हिशेबपट्टी करत असतांना बाजारसमितीच्या नव्या नियमानुसार अडत वसूल करता येत नाही. त्याचप्रमाणे या हिशेबपट्टीमध्ये ५० किलो खालील पोत्यासाठी उतराई २ रु.२० पैसे, निकलाई १ रु. ८६ पैसे तर वापसी १ रु.७५ पैसे तर प्रति क्विंटल उतराई ४ रु. २९ पैसे तर निकालई ३ रु. ६० पैसे आणि वापसी ३.६८ पैसे असे दर बाजारसमितीने निर्धारीत केले असताना अनेक अडत्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या हिशेबपट्टीत या नियमांचे उल्लंघन करून मनात वाटेल तसे दर आकारून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बाजारसमितीचे संचालक पोपट घोडेराव यांनी केली आहे.

शेतकरी हिताला प्राधान्य, तक्रारीची रितसर चौकशी होणार
बाजारसमितीचे संचालक घोडेराव यांनी रितसर हिशेब पट्टी संदर्भात दिलेल्या तक्रारीला अनुसरुन निश्चितच शेतकरी हिताला प्राधान्य देत सभेमध्ये हा प्रस्ताव ठेवत योग्य ती चौकशी केल्या जाईल. बाजार समितीने ठरवून दिल्याप्रमाणे हिशेब पट्टीत रक्कम वसुल करणे आवश्यक आहे; मात्र याकडे अडत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असेल तर ते मान्य केल्या जाणार नाही.
– राजेंद्र गोरले सभापती, कृउबास अचलपूर

Tags

follow us