विवेक रामास्वामी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नव्हे तर उपराष्ट्रपती होणार! ट्रम्प यांच्यासमोरच घोषणा

Vivek Ramaswamy : अमेरिकेत 2024 च्या निवडणुकीत भारतीय वंशाची व्यक्ती राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता संपल्यात जमा आहे. अमेरिकेत पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) असणार हे निश्चित झाले आहे. आयोवा कॉकसमधील दमदार विजयानंतर ट्रम्प यांचा दावा आणखी मजबूत झाला आहे. भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी (Vivek Ramaswamy) यांना ट्रम्प यांना पाठिंबा […]

Vivek Ramaswamy

Vivek Ramaswamy

Vivek Ramaswamy : अमेरिकेत 2024 च्या निवडणुकीत भारतीय वंशाची व्यक्ती राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता संपल्यात जमा आहे. अमेरिकेत पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) असणार हे निश्चित झाले आहे. आयोवा कॉकसमधील दमदार विजयानंतर ट्रम्प यांचा दावा आणखी मजबूत झाला आहे. भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी (Vivek Ramaswamy) यांना ट्रम्प यांना पाठिंबा दिला आहे.

भारतीय वंशाचे उद्योजक विवेक रामास्वामी यांना या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी करायची होती. परंतु आयोवा कॉकसमध्ये त्यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. त्यानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, लोकांनी त्यांच्यासाठी व्हीपी-व्हीपीच्या घोषणा दिल्या.

याचा अर्थ रामास्वामी यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवायचे आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत ते न्यू हॅम्पशायरमध्ये एकत्र होते, त्यावेळी लोकांनी त्यांच्यासाठी VP-VP च्या घोषणा दिल्या.

जरांगे मुंबईला येण्यासाठी निघण्यापू्र्वीच शिंदे सरकारचे मोठे पाऊल : अध्यादेशाचा अंतिम मसुदा तयार

मात्र यावेळी रामास्वामी यांनीही ट्रम्प यांच्या समर्थनार्थ भाषण केले. रामास्वामी यांचे भाषण संपल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांचे कौतुक केले आणि ते आमच्यासोबत दीर्घकाळ काम करतील असे सांगितले. अॅटकिन्सन, न्यू हॅम्पशायर येथे भाषण देताना रामास्वामी म्हणाले, ‘ही व्यक्ती (ट्रम्प) पुढील राष्ट्रपती होईल.’

कोणाला किती मते मिळाली?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक यावर्षी 5 नोव्हेंबरला होणार असून यात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आमनेसामने असतील. आयोवा कॉकसमध्ये फ्लोरिडाचे गव्हर्नर आर. डीसॅंटिस यांनी संयुक्त राष्ट्रांच्या माजी राजदूत निक्की हेली यांचा पराभव करत दुसरे स्थान पटकावले आहे. त्या उमेदवार होण्याच्या शर्यतीतील एकमेव महिला होत्या. आयोवा कॉकसनंतर आता 23 जानेवारीला न्यू हॅम्पशायरमध्ये रिपब्लिकन दावेदारांमध्ये लढत होणार आहे.

आयोवा कॉकसमध्ये 77 वर्षीय ट्रम्प यांना 51 टक्के, डीसँटीस यांना 21.2 टक्के आणि हेली यांना 19.1 टक्के मते मिळाली आहेत. अमेरिकन उद्योजक विवेक रामास्वामी यांना केवळ 7.7 टक्के मते मिळाली. आयोवाच्या रिपब्लिकन कॉकसमध्ये ट्रम्प यांचा विजय हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे.

नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरेंकडून सुप्रीम कोर्टात याचिका, ‘या’ तारखेला होणार सुनावणी

काय म्हणाले ट्रम्प?
ट्रम्प यांनी विजयानंतर आयोवा येथील मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले की आपण एकत्र येऊन जगाच्या समस्या सोडवू शकलो तर खूप छान होईल. हे लवकरच होईल.’ उमेदवारी मागे घेणाऱ्या रामास्वामीबद्दल ट्रम्प म्हणाले, ‘त्यांनी खूप चांगले काम केले आहे. त्यांनी शून्यातून सुरुवात करून भरपूर मते मिळवली.

रामास्वामी यांनी सोमवारी जाहीर केले की ते आयोवा कॉकसमध्ये निराशाजनक कामगिरीनंतर 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार होण्याच्या शर्यतीतून माघार घेत आहेत. या शर्यतीत रामास्वामी (38) यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला. यापूर्वी त्यांनी ट्रम्प यांचे ’21 व्या शतकातील सर्वोत्तम राष्ट्राध्यक्ष’ असे वर्णन केले होते.

सीमाभागातील तुमची ‘महात्मा फुले जनआरोग्य’ योजना बंद करा! सिद्धरामय्यांनी महाराष्ट्राला दरडावले

Exit mobile version