Israel Iran War News : शुक्रवारी सकाळीच इराणची राजधानी तेहरान शहरात (Israel Iran War News) स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. कुणाच्याही मनीध्यानी नसताना इस्त्रायलने अगदी अचूक हल्ला केला (Israel Attack) होता. हल्ला कुठे तर थेट इराणच्या आण्विक ठिकाणांवरच. इस्त्रायली सैन्याच्या (Israel Army) या हल्ल्यात इराणचे सर्वात महत्वाचे आण्विक ठिकाणच नष्ट झालं. इस्त्रायलला जे साध्य करायचं होतं ते त्यानं केलंही. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या वक्तव्यातूनच ही गोष्ट अधोरेखित झाली. पण तरीही हा हल्ला करण्यामागं नक्की काय कारण होतं? इस्त्रायलने आताच इतका मोठा हल्ला का केला? असे सवाल जगाच्या राजकारणात चर्चिले जात आहेत. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या..
इस्त्रायलने इराण विरोधात सुरू (Iran Israel Tension) केलेल्या या लष्करी कारवाईला ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ असं नाव दिलं आहे. ऑपरेशन राबवून इराणच्या आण्विक ठिकाणांनाच नष्ट करण्यात आलं. इराण ज्यावेळी अतिशय वेगाने आपला आण्विक कार्यक्रम पूर्ण करत होता नेमक्या त्याचवेळी इस्त्रायलने प्रहार केला आणि टायमिंग साधलं. या हल्ल्यात इराणचं किती नुकसान झालं याची अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र नतांज आण्विक साइट नष्ट झाल्याचं इराणनं मान्य केलं आहे. याच ठिकाणी इराण युरेनियम इनरिचमेंट करत होता. यानंतर पुढील टप्प्यात अणुबॉम्ब तयार केला जातो.
इतकंच नाही तर या हल्ल्यात इराणचे शास्त्रज्ञ आणि प्रमुख लष्करी अधिकारी ठार केल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे. इराणचा बॅलेस्टिक मिसाइल प्रोग्रामही संकटात टाकण्याचं काम आम्ही केल्याचं इस्त्रायली सैन्याचं म्हणणं आहे. इराणच्या एअर डिफेन्स सिस्टीमला भेदून इस्त्रायलचे फायटर जेट तेहरानमध्ये घुसले आणि तुफान बॉम्बफेक केली.
नव्या युद्धाची ठिणगी! इस्त्रायलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला; आण्विक ठिकाणे केली उद्ध्वस्त
पण तरीही इस्त्रायलने इतका मोठा हल्ला का केला? हल्ला केल्यानंतर परिस्थिती चिघळू शकते, इराण पलटवार करू शकतो, युद्धाचा भडका उडू शकतो या गोष्टींची जाणीव असतानाही इस्त्रायलने इतका मोठा प्रहार का केला? तर याचं उत्तर स्वतः पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी एक व्हिडिओ जारी करत दिलं.
‘इराणचे हुकूमशाह अत्यंत बेदरकारपणे इस्त्रायलच्या विनाशाची विधानं करत आले आहेत. अलीकडच्या काळात इराणने नऊ अणुबॉम्बसाठी पुरेशा प्रमाणात उच्च संवर्धित युरेनियमचे उत्पादन केले आहे’, अशी माहिती नेतान्याहू यांनी दिली. कदाचित याच कारणामुळे इस्त्रायलने कोणत्याही परिणामांचा विचार न करता हल्ला केला असावा असे आता सांगितले जात आहे.
जर इराणने अणुबॉम्ब तयार करण्यात यश मिळवलं तर आपल्या देशाचं अस्तित्वच संकटात येईल अशी भीती इस्त्रायलला वाटत आली आहे. त्यामुळे इराणने कोणत्याही परिस्थितीत अणुबॉम्ब तयार करू नये यासाठी इस्त्रायल प्रयत्न करत असतो. इराणवर बारकाईने लक्ष ठेवलं जातं. इराणने अणुबॉम्ब तयार करू नये असे अमेरिकेलाही वाटते. ‘इराण अणुबॉम्ब तयार करू शकत नाही. काहीही झालं तरी अमेरिका इराणला असे करू देणार नाही’, असा इशारा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) दिला होता. हा संदर्भही यामागे आहे.
Moments ago, Israel launched Operation “Rising Lion”, a targeted military operation to roll back the Iranian threat to Israel’s very survival.
This operation will continue for as many days as it takes to remove this threat.
——
Statement by Prime Minister Benjamin Netanyahu: pic.twitter.com/XgUTy90g1S
— Benjamin Netanyahu – בנימין נתניהו (@netanyahu) June 13, 2025
अमेरिका आणि इस्त्रायल विरोधात असतानाही इराणने आपलं काम सुरुच ठेवलं होतं. त्यामुळे जे होणार होतं तेच घडलं. इस्त्रायलने इराणच्या आण्विक ठिकाणालाच उडवून टाकलं. या कारवाईचं समर्थन करताना नेतान्याहू म्हणाले, आम्ही इराणच्या आण्विक संवर्धन केंद्रावर हल्ला केला आहे. नतांजमध्ये इराणच्या मुख्य संवर्धन केंद्राला टार्गेट केलं. यावर काम करणाऱ्या प्रमुख वैज्ञानिकांनाही आम्ही टार्गेट केलं. इराणच्या बॅलेस्टिक मिसाइल केंद्रावरही हल्ला केला.
आम्ही आमच्या पुढील पिढीसमोर हे धोके ठेऊ शकत नाही. जर आताच कारवाई केली नाही तर पुढील पिढी येणारही नाही असे नेतान्याहू म्हणाले. त्यांच्या या शब्दांतच इराणवर हल्ला करण्याचं उत्तर सापडतं. इराण फक्त आण्विक कार्यक्रमावरच नाही तर मिसाइल विकासावरही लक्ष केंद्रीत करत होता. तीन वर्षात दहा हजार मिसाइल तयार करण्याचं त्यांचं उद्दीष्ट आहे. हा सहन करण्यापलीकडचा धोका आहे. रोखला पाहिजेच होता अशा शब्दांत नेतान्याहू यांनी हल्ल्याचं समर्थन केलं.
इस्त्रायली डिफेन्स फोर्सनेही हल्ल्याचं (Israel Defence Force) कारण स्पष्ट केलं आहे. इस्त्रायलच्या विनाशाचं आवाहन इराण अनेक वर्षांपासून करत आला आहे. अशा परिस्थितीत आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. अलीकडच्या काही महिन्यांत आम्हाला अशी गुप्त माहिती मिळाली होती की इराण आण्विक हत्यारे मिळवण्याच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे आज (शुक्रवार) सकाळीच आयडीएफने इराणच्या आण्विक कार्यक्रमाला टार्गेट करुन अचूक हल्ले केले. आमच्याकडे आता दुसरा कोणताच पर्याय नाही. आम्ही आण्विक हत्यार मिळवण्याची परवानगी इराणला देऊ शकत नाही असे आयडीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.