Download App

चीनला दणका! अमेरिका TikTok बंदीच्या तयारीत; भडकलेल्या चीनचाही पलटवार

US Passed Bill to Ban on TikTok : चीनी सोशल मीडिया अॅप टिकटॉकवर अमेरिकेत (TikTok) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या अॅपवर बंदी घालण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये कनिष्ठ सभागृहात सादर करण्यात आला. हा प्रस्ताव मंजूर झाला तर अमेरिकेतही अॅप बंद होणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत भारत सरकारने 2020 मध्येच या अॅपवर बंदी घातली होती. त्यानंतर आता अमेरिकाही भारताच्या पावलावर पाऊल टाकत आहे. या प्रकारामुळे चीन चांगलाच खवळला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने अमेरिकेच्या या कृत्याचा निषेध व्यक्त केला आहे.

टिकटॉक अमेरिकेच्या सुरक्षेला धोका आहे यात काहीच तथ्य नाही. अमेरिका आमच्या बरोबर स्पर्धा करू शकला नाही. त्यामुळे फक्त संतापाच्या भरात अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे, असे चीनच्या प्रवक्त्याने सांगितले. यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने टिकटॉकला दोन पर्याय सादर केले होते. पहिला पर्याय असा होता की सहा महिन्यांच्या आता टिकटॉकची विक्री अमेरिकेला करावी दुसरा म्हणजे अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घातली जाईल. चीनने यातील दुसरा पर्याय निवडला.

Nepal : नेपाळमध्ये ‘चीन’ची एन्ट्री! जुनी युती तुटली; सरकारमध्ये PM प्रचंड अन् चीन समर्थकांची आघाडी?

सुरक्षेच्या कारणावरून टिकटॉकवर बंदी घातली जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी अनेक देशात या अॅपवर बंदी घातली गेली आहे. चीनचा डाव अनेक देशांच्या लक्षात आला आहे. भारत,  युरोपियन युनियन आणि कॅनडा या देशांना टिकटॉक बंद केले आहे. सभागृहात हा प्रस्ताव मांडण्यात आला त्यावेळी अमेरिकन खासदारांनी भारताचे उदाहण दिले. सुरक्षेला धोका असल्याचे कारण देत भारत सरकारने 2020 मध्येच या अॅपवर बंदी घातली. परंतु, आपल्याकडे मात्र अजूनही विचारच सुरू असल्याचे खासदारांनी सांगितले.

काही खासदारांनी असेही सांगितले की बाइटडान्स कंपनी चीन सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. अशा परिस्थितीत त्यांना हवे असल्यास ते अमेरिकन टिकटॉक युजर्सचा डाटा स्कॅन करू शकतात. त्याद्वारे नागरिकांची माहिती गोळा करू शकतात. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे निश्चितच धोकादायक आहे. यानंतर आता अमेरिकेत टिकटॉकवर खरंच बंद होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

चीनचा मुद्दा आला की सरकारची दातखिळी बसते, केवळ चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालून…; आव्हाडांचे टीकास्त्र

follow us