Japan : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांच्या मुलांच्या खासगी पार्टीमु्ळे मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. हा वाद इतका वाढला की पंतप्रधानांनी आपल्या मुलावरच कारवाई करण्याचा निर्णय घेतला. राजकारणात सहसा असे घडल्याचे कधी दिसत नाही. मात्र, जपानच्या (Japan) राजकारणात हे घडले आहे.
पंतप्रधान किशिदा सोमवारी म्हणाले, आपला मुलगा, एका खासगी पार्टीसाठी पंतप्रधान निवासस्थानाचा गैरवापर केल्याची जबाबदारी घेतल्यानंतर कार्यकारी नीती सचिव पदाचा राजीनामा देत आहे. या पार्टीचे फोटो एका साप्ताहिकाने प्रसिद्ध केले होते. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड राग धुमसत होता.
चिंता वाढली, चीनमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, जूनअखेर पुन्हा येणार कोरोनाची लाट
AP या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांचा मुलगा शोतारो किशिदा यांनी पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी 30 डिसेंबर 2022 रोजी एका पार्टीसाठी नातलगांसह अन्य लोकांना आमंत्रित केले होते. शोतारो किशिदा यांच्याकडे राजकीय व्यवहार कार्यकारी सचिवपद आहे. त्यांच्या या खासगी पार्टीचे फोटो शुकन बुंशुन या साप्ताहिकाने प्रसिद्ध केले होते.
यानंतर मोठा वाद निर्माण झाला. सरकारवर टीकेची झोड उठली. वाद वाढत गेल्याने सरकारही दडपणात आले. त्यामुळे अखेर पंतप्रधानांना कारवाई करावी लागली. राजकीय व्यवहार सचिव म्हणून त्यांचे काम अयोग्य होते. आपण त्यांची जबाबदारी निश्चित करत त्यांना बदलण्याचा निर्णय घेतला आहे, असे किशिदा यांनी सोमवारी रात्री प्रसारमाध्यमांना सांगितले.
Turkiye Election 2023: एर्दोगन पुन्हा एकदा तुर्कियेच्या अध्यक्षपदी