Kansas Shooting : अमेरिकेत काही केल्या गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. माथेफिरूंकडून होणाऱ्या (Kansas Shooting) गोळीबारात निरपराध नागरिकांचा बळी जात आहे. अमेरिकेत अनिर्बंध पद्धतीने (America) वाढलेल्या गन कल्चरचे हे साईड इफेक्ट आता दिसू लागले आहेत. आताही अमेरिकेतील कॅन्सस शहरात गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत दोघा जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ मुलांसह 22 जण जखमी झाले आहेत. या जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सिटी चीफ्स सुपर बाउल क्रीडा स्पर्धेदरम्यान ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. येथे जमलेल्या लोकांनी एका संशयिताला पकडण्यात मदत केली. येथे आलेल्या लोकांना सुरक्षित वातावरणाची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. आज येथे जे काही घडले त्यामुळे मी दुःखी आहे, असे उद्गार कॅन्सस शहराचे पोलीस प्रमुख स्टेसी ग्रेव्हज यांनी काढले.
मोठी बातमी! अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, 22 ठार तर 60 जण जखमी
पोलिसांनी ज्या लोकांना अटक केली आहे ते नेमके कोण आहेत याची माहिती दिलेली नाही. तसेच गोळीबार का करण्यात आला या प्रश्नाचं उत्तरही पोलिसांकडून मिळालं नाही. त्यामुळे गोळीबार का केला हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. याआधी डिसेंबर 2023 मध्ये अमेरिकेतील लेविस्टन शहरात मोठा गोळीबार झाला होता. एका व्यक्तीने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तब्बल 22 जणांचा मृत्यू झाला होता. तर अन्य 60 जण जखमी झाले होते.
या घटनेची माहिती देत एंड्रोस्कोगिन काउंटी शेरीफ कार्यालयाने आपल्या फेसबुक पेजवर संशयितांचे दोन फोटो शेअर केले होते. यामध्ये एक बंदूकधारी व्यक्ती खांद्यावर बंदूक घेऊन उभा असल्याचे दिसत होते. एका कार्यालयात प्रवेश करताना हा व्यक्ती दिसत होता. गोळीबारानंतर हा व्यक्ती फरार झाला झाला होता. या घटनेने अमेरिकेत मोठी खळबळ उडाली होती. यानंतरही गोळीबाराच्या घटना घडल्या. आता पुन्हा अशीच घटना घडली आहे.
मोठी बातमी! ‘गोळीबार’ प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना अटक; रिव्हॉल्वर जप्त