Elon Musk Challenges Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे (Donald Trump) जुने सहकारी आणि सल्लागार राहिलेले एलन मस्कने (Elon Musk) ट्रम्प सरकारच्या वन बिग, ब्यूटीफूल बिलावर पुन्हा टीका केली आहे. हे विधेयक म्हणजे वेडेपणा आहे तसेच करदात्यांवर भार आहे असे मस्क म्हणाले आहेत. जर या विधेयकाला सिनेटने मंजुरी दिली तर दुसऱ्याच दिवशी ‘अमेरिका पार्टी’ नावाचा नवा राजकीय पक्ष स्थापन करू, असा इशारा एलन मस्क (Elon Musk Challenges Donald Trump) यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर शांत होत असलेला ट्रम्प-मस्क वाद पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे एक महत्वाचे विधेयक आहे. यामध्ये संरक्षण, ऊर्जा आणि सीमा सुरक्षेसाठी मोठ्या निधीची मागणी करण्यात आली आहे. परंतु, पोषण आणि आरोग्य सेवांत कपातीची तरतूद करण्यात आली आहे. पुढील दहा वर्षांत विधेयक राष्ट्रीय तूट 3.3 ट्रिलियन डॉलरने वाढवील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ट्रम्पना भिडणाऱ्या एलन मस्कची तलवार म्यान, मागितली माफी; म्हणाले, “मला दुःख वाटतं की..”
याबाबत मस्कने एक पोस्ट शेअर केली आहे. हे विधेयक कर्जमर्यादा विक्रमी पाच ट्रिलयन डॉलर्सने वाढवते. आता ही गोष्ट स्पष्ट आहे की आम्ही पॉर्की पिग पार्टी असणाऱ्या एका देशात राहतोय. आता लोकांच्या हिताकडे लक्ष देणाऱ्या एका नव्या पक्षाची वेळ आली आहे. यानंतर त्यांनी रिपब्लीकन नेत्यांवर जोरदार टीका केली. हाउस फ्रिडम कॉकसचे चेअरमन अँडी हॅरिस यांच्यावरही तिखट टीका केली. सरकारी खर्च कमी करण्याच्या नावाखाली जर तुम्हाला निवडलं गेलं असेल आणि सर्वाधिक कर्जमर्यादा वाढवणाऱ्या विधेयकावर मतदान करत असाल तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे.
पुढे मस्कने स्पष्ट शब्दांत सांगितले की जर हे मुर्खपणाचे विधेयक मंजूर झाले तर दुसऱ्याच दिवशी अमेरिका पार्टी नावाचा पक्ष स्थापन करील. डेमोक्रेट-रिपब्लिकनच्या या यूनिपार्टी सिस्टीमचा पर्याय हवा आहे जेणेकरुन देशातील सर्वसामान्य जनतेचा आवाज उठवता येईल असे एलन मस्क यांनी सांगितले.
एलन मस्क काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार म्हणून वावरत होते. गव्हर्नमेंट एफिशिएन्सी विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी मस्कला देण्यात आली होती. परंतु, लवकरच दोघांत धुसफूस सुरू झाली. जर मी पाठिंबा दिला नसता तर ट्रम्प निवडणूक जिंकू शकले नसते असा दावा मस्कने काही दिवसांपूर्वी केला होता. 5 जून रोजी त्यांनी हे ट्विट केलं होतं. माझ्याशिवाय ट्रम्प निवडणुकीत पराभूत झाले असते अशा आशयाचं ट्विट एलन मस्कने केलं होतं.