Download App

नव्या युद्धाची ठिणगी! इस्त्रायलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला; आण्विक ठिकाणे केली उद्ध्वस्त

शुक्रवारी इस्त्रायलने इराणवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात राजधानी तेहरान शहराला (Tehran City) टार्गेट करण्यात आलं.

Israel Iran War News : इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष वाढतच चालला (Israel Iran War News) आहे. शुक्रवारी इस्त्रायलने इराणवर मोठा (Israel Attack) हल्ला केला. या हल्ल्यात राजधानी तेहरान शहराला (Tehran City) टार्गेट करण्यात आलं. तुफान बॉम्बफेक करण्यात आली. या हल्ल्यांत संपूर्ण तेहरान हादरून गेले. इतकेच नाही तर या हल्ल्यात इराणच्या आण्विक ठिकाणांनाही नष्ट करण्यात आलं. या हल्ल्यात इराणचे सैन्यप्रमुख,न्यूक्लिअर सायंटिस्ट (Iran News) यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दावा केला आहे की इस्त्रायलच्या सैन्याने टारगेटिड ऑपरेशन लाँच केले आहे. इराणच्या आण्विक कार्यक्रमाला चालना देणाऱ्या वैज्ञानिकांना टार्गेट करण्यात आलं आहे. या हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान झालं आहे. या हल्ल्यात इराणची आण्विक ठिकाणे नष्ट झाली आहेत. सैन्य ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. या हल्ल्यानंतर इस्त्रायलने हवाई हद्द बंद केली आहे.

Iran Israel War : मोठी बातमी! युद्ध भडकले, इराणचा इस्रायलवर मिसाईल हल्ला

इराण अतिशय वेगाने आपल्या अणु कार्यक्रमाला पुढे नेत असल्याच्या बातम्या येत होत्या. नेमक्या याच वेळी हा हल्ला झाला. शुक्रवारी सकाळीच तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येऊ लागले. सगळीकडे धूर दिसत होता. इस्त्रायलने जर हल्ला केला तर आम्ही सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देऊ असा इशारा इराणने दिला होता. त्यानंतरही इस्त्रायलने इराणच्या इशाऱ्यांना भीक न घालता हल्ला केलाच. या हल्ल्यात इराणला मोठा झटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.

या हल्ल्यानंतर इराणही प्रत्युत्तर देऊ शकतो अशी शक्यता इस्त्रायलचे संरक्षण मंत्री इस्त्रायल काट्ज यांनी व्यक्त केली आहे. इस्त्रायलमध्ये ड्रोन आणि मिसाइल्सने हल्ले होऊ शकतात. त्यामुळे इस्त्रायलमध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. या हल्ल्यात इराणचे किती आणि कुठे नुकसान झाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यानंतर इराणमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अमेरिकेची सावध प्रतिक्रिया

अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्को रुबियो यांनी सांगितले की इस्त्रायलने इराणविरुद्ध एकतर्फी कारवाई केली आहे. या हल्ल्यात अमेरिकेचा कोणताही सहभाग नाही. इस्त्रायलच्या संरक्षणासाठी ही कारवाई गरजेची होती असे इस्त्रायलच्या राज्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि प्रशासनाने सैन्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलली आहेत. तसेच आम्ही आमच्या सहकाऱ्यांच्या कायम संपर्कात आहोत.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पची मोठी घोषणा, इराणसह 12 देशांमधील लोकांना अमेरिकेत बंदी

follow us