Indian Language in USA : अमेरिकेत तेलुगू भाषा बोलणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सन 2016 मध्ये अमेरिकेत तेलुगू भाषा (Telugu Language) बोलणाऱ्या लोकांची संख्या 3.2 लाख होती. आता 2024 मध्ये ही संख्या वाढून 12 लाख 3 हजार इतकी झाली आहे. तेलुगू अमेरिकेतील अकराव्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी विदेशी भाषा बनली आहे. हिंदी आणि गुजराती नंतर तेलुगू अमेरिकेत सर्वाधिक बोलली जाणारी तिसरी भारतीय भाषा (Indian Language) बनली आहे.
अमेरिकेत तेलुगू भाषिक लोकांच्या संख्येत वाढ झाली (Telugu in USA) आहे. युएस सेन्सर ब्यूरोवर आधारित एका अहवालावरून ही माहिती समोर आली आहे. यामध्ये म्हटले आहे की तेलुगू भाषा बोलणाऱ्या लोकांच्या (Telugu People in America) संख्येत वाढ झाली आहे. कॅलिफोर्निया शहरात सर्वाधिक दोन लाख तेलुगू भाषिक राहतात. यानंतर टेक्सास दुसऱ्या क्रमांकावर आहे. या शहरात जवळपास दीड लाख तेलुगू भाषिक राहतात. तर न्यू जर्सीमध्ये 1.1 लाख तेलुगू भाषिक लोक राहतात.
युक्रेनची मागणी रशिया भडकला! अमेरिका यू टर्नच्या तयारीत; काय घडतंय युद्धाच्या मैदानात
इलिनोईस शहरात 83 हजार, जॉर्जियामध्ये 52 हजार आणि वर्जिनियामध्ये 78 हजार तेलुगू भाषिक लोक राहतात. या राज्यांमध्येही तेलुगू भाषिक लोकसंख्येत वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. तेलुगू समुदाय संघ ही या अंदाजाशी सहमत आहे. 350 भाषांमध्ये तेलुगू अकरावी सर्वाधिक बोलली जाणारी विदेशी (Indian Language in USA) भाषा आहे. यामागचे सर्वात मोठे कारण अमेरिकेत शिक्षणाच्या निमित्ताने येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे.
एका रिपोर्टनुसार दरवर्षी अमेरिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 60 ते 70 हजारांच्या आसपास आहे आणि जवळपास 10 हजार एच 1 विसाधारक दरवर्षी अमेरिकेत येतात. तेलुगू असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिकाचे माजी सचिव अशोक कोल्ला यांनी सांगितले की अमेरिकेत येणाऱ्यांपैकी 80 टक्के लोक संघटनेत नोंदणीकृत आहेत. 75 टक्के लोक अमेरिकेतील डलास, नॉर्थ कॅरोलिना, न्यू जर्सी, अटलांटा, फ्लोरिडा आणि नॅशविले या ठिकाणी वास्तव्य करतात.
चीनला दणका! अमेरिका TikTok बंदीच्या तयारीत; भडकलेल्या चीनचाही पलटवार
जुन्या पिढीतील बहुतांश व्यावसायिक आहेत. तर 80 टक्के युवा वर्ग आयटी आणि फायनान्स क्षेत्रात आहेत. 2024 मधील इंडीयन मोबिलिटी रिपोर्टनुसार तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) विद्यार्थी अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा समूह आहे. एका रिपोर्ट नुसार केंट स्टेट विद्यापीठात नवीन विद्या बॅचला तेलुगू भाषेत लिहिलेली वेलकम स्टुडंट्स स्वागत पुस्तक दिले जाते.