Pakistan : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी मोठा दावा केला आहे ज्यामुळे त्या देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. खान यांनी म्हटले, की माजी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी भारताशी पुन्हा दोस्ती करण्यासाठी दबाव आणला होता. बाजवा यांना भारताबरोबर मैत्री पाहिजे होती. त्यासाठीच ते खान यांच्यावर दबाव आणत होते. इम्रान खान यांच्या हवाल्याने वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
खान पुढे म्हणाले, एक दिवस बाजवा काहीतरी बोलले मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी वक्तव्य मागे घेतले. सार्वत्रिक निवडणुकांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पीटीआय अध्यक्ष म्हणाले, जर ९० दिवसांत निवडणुका झाल्या नाहीत तर देशात संविधान टिकणार नाही आणि मग थेट कारवाई केली जाईल.
या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानने पुन्हा सीमेवरील भारतासोबत कोणतीही बॅकचॅनल चर्चा करत असल्याचे नाकारले. परंतु, त्याच वेळी शांततापूर्ण शेजारी असण्याच्या आपल्या इच्छेचा पुनरुच्चार केला. एका प्रश्नाला उत्तर देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या म्हणाल्या, या टप्प्यावर, पाकिस्तान आणि भारत यांच्यात कोणताही बॅकचॅनल संवाद सुरू नाही. दोन शेजारी देशांमधील संबंध गेल्या अनेक वर्षांपासून स्थिर आहेत.
सध्या पाकिस्तानने भारताबरोबरच राजनैतिक संबंधच कमी केले असे नाही तर द्विपक्षीय व्यापारही बंद केला आहे. भारत सरकारने ज्यावेळी जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केले तेव्हापासून पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे.
Zuckerberg Became Father : मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांना तिसऱ्यांदा कन्यारत्न
पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी भारताबरोबरचे सर्व संबंध तोडले आहेत. तथापि 2021 मध्ये दोन देशांच्या बॅकचॅनल चर्चेत गुंतल्याने संबंध बदलण्याची शक्यता होती. फेब्रुवारी 2021 मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकार्यांमध्ये झालेल्या गुप्त बैठकांमध्ये नियंत्रण रेषा (एलओसी) युद्धविराम कराराचे नूतनीकरण करण्यात आल्याची माहिती आहे.
आता या पुढील टप्पा म्हणजे द्विपक्षीय व्यापार सुरू करण्याच्या दिशेने हालचाली सुरू करणे. मात्र, यामध्ये अनेक अडचणी आहेत. तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने भारतातून साखर आणि कापूस आयात करण्याचा निर्णय नाकारला होता. त्यामुळे ही कार्यवाही रखडली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बॅकचॅनेल बैठकीसाठी पाकिस्तानला भेट देऊ शकतात असाही दावा काही वृत्तांत करण्यात आला होता.