बिजिंग : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्रपती झाले आहेत. अधिकृत रित्या त्यांना चीनचे राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले आहे. त्यामुळे ते पहिले असे राष्ट्रपती झाले आहेत ज्यांनी सलग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्रपती पदाचा पदभार स्विकारला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चीनमधील पीपल्स पार्टीच्या वार्षिक नॅशनल पीपल्स कॉंग्रेसचं आयोजन करण्यात आलं होत. यामध्ये शी जिनपिंग यांना सर्वोच्च नेते म्हणून निवडण्यात आलं. तर आता त्यांना चीनच्या सेंट्रल मिलिट्री कमीशनचं अध्यक्ष निवडण्यात आलं आहे.
राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर आता ते सोमवारी संसदीय बैठकीला संबोधित करतील. यावेळी ते पत्रकारांशी देखील संवाद साधणार आहेत. या आठवड्याच्या सुरूवातीलच कम्युनिस्ट पार्टीने यासंदर्भात एक ड्राफ्ट प्लॅन सादर केला होता. यामध्ये सांगण्यात आलं होत की, कम्युनिस्ट पार्टी सरकारवर आपलं वर्चस्व किंवा नियंत्रण आता वाढवणार आहे.
ऑक्टोबरमध्ये चीनमधील पीपल्स पार्टीच्या वार्षिक नॅशनल पीपल्स कॉंग्रेसचं आयोजन करण्यात आलं होत. यामध्ये शी जिनपिंग यांनी त्यांच्या नव्या टीमची निवड देखील केली होती. शी जिनपिंग यांनी निवडलेल्या टीमच्या अंतर्गतच चीनचे पंतप्रधान ली कियांग यांची निवड करण्यात आली आहे. तसेच ली शी, डिंग जुएक्सियांग आणि काई क्यूई यांना देखील यामध्ये जागा देण्यात आली होती.
शी जिनपिंग हे सत्तेमध्ये येण्याअगोदर चीनच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ दोनदा 5 वर्षांचा असायचा तर 68 वर्षांपर्यंत वयोमर्यादा असायची. पण आता शी जिनपिंग यांनी हा नियम बदलला आहे. त्यामुळेच शी जिनपिंग हे 69 वर्षांचे असूनही आता तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्रपती झाले आहेत.