YouTube Down : जगात सर्वात जास्त लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म असलेल्या यूट्यूब 18 फेब्रुवारी रोजी भारतासह जगातील अनेक देशात डाउन झाला असल्याची माहिती समोर येत आहे. यूट्यूबला मोठ्या प्रमाणात आउटेचा सामना करावा लागत आहे. आउटेचा मोठ्या प्रमाणात फटका यूर्जसला बसला आहे. एकट्या अमेरिकेत 53,00 हून अधिक लोकांनी आउटेजची तक्रार केली. स्क्रीनवर “समथिंग वॉन्ट रॉंग” एरर मेसेज दिसत असल्याने व्हिडिओ प्ले करणे किंवा कंटेंट अपलोड करणे शक्य होत नसल्याची तक्रार यूजर्स करत आहे.
#YouTubeDOWN #youtube
Is this happening with you too?? pic.twitter.com/gSTfmDaTVr— nkd👾 (@navaldogra) February 18, 2026
अहवालांनुसार, काही यूजर्सांना व्हिडिओ (YouTube Down) लोड करण्यात अडचण येत आहे, तर काहींसाठी, होमपेज रिफ्रेश होत नाही. मोबाइल अॅप आणि वेब व्हर्जन दोन्हीमध्ये समस्या आहेत, जरी आउटेजचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनेक देशांतील यूजर्सने सोशल मीडियावर अॅपबाबत तक्रार केली आहे.
तर दुसरीकडे याबाबत आतापर्यंत यूट्यूबने अधिकृत विधान जारी केलेले नाही. अशा तांत्रिक समस्या सामान्यतः सर्व्हर समस्या, अपडेट बिघाड किंवा नेटवर्क ग्लिचमुळे उद्भवतात मात्र याबाबत यूट्यूबकडून कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही. यूट्यूब आउटेज आल्यानंतर युजर्स पर्यायी प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत आणि #youtubedown हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.
