35 वर्षांचा प्रवास! आता अखेरचा डाव; गोकुळ निवडणुकीतून अरुण डोंगळेंची निवृत्तीची घोषणा

Gokul Milk Union Election : तब्बल 35 वर्षे संचालक म्हणून काम केल्यानंतर यापुढे गोकुळची कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं डोंगळे यांनी सांगितलं.

News Photo   2026 09 13T142531.615

Arun Dongale announces retirement from Gokul elections

Gokul Milk Union Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचाराला वेग आला असतानाच संघाचे दोन वेळा अध्यक्ष राहिलेले अरुण डोंगळे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. (Gokul) हसन मुश्रीफ यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगळे यांनी ही आपली शेवटची गोकुळ निवडणूक असल्याचे स्पष्ट केले. तब्बल 35 वर्षे संचालक म्हणून काम केल्यानंतर यापुढे गोकुळची कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

गोकुळच्या वाटचालीत आपल्याला दीर्घकाळ योगदान देता आले, असे डोंगळे यांनी नमूद केले. या काळात दोन वेळा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाली. संघाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेता आले असून, गोकुळच्या प्रगतीत आपले योगदान राहिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आता निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.

कोल्हापूरच्या ‘गोकुळ’साठी हाय व्होल्टेज लढत; सतेज पाटलांची सत्ता टिकणार की महायुती मारणार बाजी?

दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने डोंगळे मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे प्रचाराच्या धामधुमीतच त्यांनी केलेली ही घोषणा लक्षवेधी ठरली आहे. हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील गटातील महत्त्वाचे नेते म्हणून डोंगळेंकडे पाहिले जाते. त्यांच्या या भूमिकेमुळे गोकुळच्या पुढील राजकीय वाटचालीबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

गोकुळ निवडणुकीसाठी विविध गटांकडून पॅनेलची जुळवाजुळव सुरू असून, निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष मतदानाला सामोरे जावे लागणार, याकडे लक्ष लागले आहे. कोणाला पॅनेलमध्ये स्थान मिळणार आणि कोणत्या गटांची आघाडी होणार, याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर डोंगळेंची ‘शेवटची निवडणूक’ ही घोषणा आगामी समीकरणांवर काय परिणाम करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version