अहिल्यानगर ब्रेकिंग- ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचे निधन; हृदयविकाराचा त्रास झाल्याने सुरु होता उपचार

अहिल्यानगरमधील ज्येष्ठ नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास एकनाथ कोतकर (वय 74) यांचे आज सकाळी निधन झाले.

Bhanudas Eknath Kotkar death

Bhanudas Eknath Kotkar death

Ahilyanagar Bhanudas Eknath Kotkar death:अहिल्यानगरमधील ज्येष्ठ नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास एकनाथ कोतकर (वय ७४) यांचे आज, शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी निधन झाले. त्यांना अचानक हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला, त्यानंतर त्यांना उपचारासाठी अहिल्यानगरमधील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तिथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवी माहिती; लाईव्ह बातम्या पाहून शुटर्स सावध

भानुदास कोतकर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील केडगाव परिसरात गेल्या ४० वर्षांपासून प्रभावी नेते मानले जात होते. ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राहिले आहेत. भानुदास कोतकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले.

ऑडिओ क्लिपनंतर जरांगेंनी घेतला मोठा निर्णय; मराठा समाजाला केले ‘हे’ आवाहन

नगर पंचायत समितीचे सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आणि जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. राजकारणासोबतच उद्योग क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले. ते संदीप उद्योग समूहाचे संस्थापक होते.

Exit mobile version