अमेरिका-पाकिस्तान युद्धात भारत पाकिस्तानच्या बाजूने उभा राहणार, भाजप नेत्याचा मोठा दावा

भाजप नेते मदन राठोड यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या.

Untitled Design   2026 10 16T141525.917

Untitled Design 2026 10 16T141525.917

BJP leader’s statement sparks a new controversy! : राजस्थान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांच्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाल्यास भारताने पाकिस्तानच्या बाजूने उभे राहायला हवे, कारण पाकिस्तान हा भारताचा शेजारी देश आहे, असे वक्तव्य राठोड यांनी केले. त्यांच्या या विधानावरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावरही या वक्तव्याची चर्चा सुरू असून, राजकीय वातावरण तापले आहे.

एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना मदन राठोड यांनी भारताच्या शेजारी देशांशी असलेल्या संबंधांचा उल्लेख केला. अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाल्यास भारताने पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, कारण तो आपला शेजारी देश आहे, असे त्यांनी म्हटले. मात्र, भारताशी संबंधित मुद्दे निर्माण झाल्यास पाकिस्तानने भारताच्या बाजूने उभे राहायला हवे, असेही त्यांनी नमूद केले. राठोड यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या.

पुण्यातील आयटी इंजिनिअरने संपवलं जीवन; ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी, नेमकं काय घडलं?

विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर या विधानाचे राजकीय महत्त्व वाढले आहे. त्यामुळे भाजपाच्या नेत्याने पाकिस्तानबाबत घेतलेल्या या भूमिकेवरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, काँग्रेसने या विधानावरून भाजपाला लक्ष्य केले आहे. पाकिस्तान हा दहशतवादी कारवायांशी संबंधित गंभीर आरोपांना सामोरे जाणारा देश असून, त्याच्याकडून भारतीय सैनिक आणि जवानांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे अनेकदा समोर आले आहे, अशी भूमिका काँग्रेसने मांडली. भाजपाला मदन राठोड यांच्या विधानाशी सहमत नसल्यास पक्षाने त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी केली.

 

भाजपाने या विधानाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी आणि राठोड यांच्या वक्तव्याला पक्षाचा पाठिंबा आहे की नाही, हे जाहीर करावे, अशी मागणीही काँग्रेसकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे, आम आदमी पक्षानेही या मुद्द्यावरून भाजपावर टीकास्त्र सोडले. भाजपाची आणि पाकिस्तानची विचारधारा समान असल्याचा टोला आपचे नेते रमेश मटियाला यांनी लगावला. राठोड यांच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावरही अनेक युझर्सनी नाराजी व्यक्त केली असून, भाजपाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणामुळे भाजपाला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत असून, आगामी काळात या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

खडकवासला धरणातील दूषित पाण्याचा मुद्दा ऐरणीवर; अमोल बालवडकरांनी महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर

एकीकडे विरोधकांकडून या विधानावरून भाजपाला घेरले जात असताना, दुसरीकडे मदन राठोड यांच्या वक्तव्याबाबत भाजपाकडून अद्याप अधिकृत खुलासा समोर आलेला नाही. त्यामुळे राठोड यांच्या विधानावर पक्ष काय भूमिका घेतो आणि या वादावर पडदा पडतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version