निवृत्तीचं वय वाढणार की नाही, याचीच अधिकाऱ्यांना चिंता, जनतेच्या न्यायाकडे दुर्लक्ष, सरन्यायाधीशांचा संताप अनावर

न्यायालयांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Untitled Design   2026 11 23T194046.045

Untitled Design 2026 11 23T194046.045

Chief Justice’s anger boils over : न्यायालयांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्वतःच्या सेवाशर्ती, वेतनवाढ, निवृत्तीचे वय आणि विविध सेवासुविधांच्या मागण्यांसाठी न्यायालयीन अधिकारी वारंवार निवेदने सादर करत असल्याच्या प्रकारावर त्यांनी संताप व्यक्त केला. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ जबाबदाऱ्यांची जाणीव करून देत चांगलेच सुनावले.

आता या मंडळींनी जरा जास्तच मागण्या करायला सुरुवात केली आहे. प्रत्येक प्रकरणात न्यायालयीन अधिकारी काही ना काही मागणी घेऊन निवेदने सादर करत आहेत. मग हे अधिकारी न्यायालयांमध्ये काम का करत नाहीत? दिवसभर हे नेमकं काय करतात, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे, अशा परखड शब्दांत सरन्यायाधीशांनी आपली नाराजी व्यक्त केली. न्यायालयीन व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाची जबाबदारी ओळखून काम करणं अपेक्षित आहे. मात्र, कामकाजापेक्षा वैयक्तिक मागण्यांनाच अधिक महत्त्व दिलं जात असल्याचं निरीक्षण त्यांनी यावेळी नोंदवलं.

Paschim Banga : पश्चिम बंगालचे नाव ‘पश्चिम बंगा’ करणार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची घोषणा

न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या वेळापत्रकावरही सरन्यायाधीशांनी प्रश्न उपस्थित केले. सकाळी 10 वाजता कोर्टरूममध्ये जाऊन पाहा, तिथे कुणीही जागेवर नसतं. हे अधिकारी आपल्या कार्यालयात बसून कॉफी पित असतात. न्यायालयात काय सुरू आहे, याची आम्हाला माहिती नाही, असं त्यांना वाटतं का? अशा शब्दांत त्यांनी अधिकारी वर्गाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. न्यायालयातील कामकाज सुरळीत चालण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याची भूमिका महत्त्वाची असते. प्रकरणांची नोंद, कागदपत्रांची पूर्तता आणि न्यायालयीन प्रक्रियेला गती देण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असते. त्यामुळे आपल्या कामात हलगर्जीपणा करून केवळ सुविधांच्या मागण्यांसाठी सक्रिय राहणं योग्य नसल्याचं त्यांच्या वक्तव्यामधून स्पष्ट झालं.

न्यायालयीन अधिकाऱ्यांना नागरिकांना वेळेत न्याय मिळवून देण्यापेक्षा स्वतःच्या सेवासुविधांची अधिक चिंता असल्याचंही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं. 24 तास या लोकांना केवळ स्वतःच्या सेवाशर्ती आणि लाभांचाच विचार असतो. निवृत्तीचं वय वाढणार की नाही, याचाच त्यांना ध्यास लागलेला असतो. दुसरीकडे न्यायालयांच्या बाहेर नागरिक न्यायाच्या प्रतीक्षेत रांगेत उभे आहेत. मात्र, या अधिकाऱ्यांना त्याचं काहीही देणंघेणं नाही, अशा शब्दांत सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी आपला संताप व्यक्त केला.

भारत-नेपाळ पुन्हा दोस्ती ! 10 मुद्द्यांचा रोडमॅप, नेपाळला किती हजार कोटींचे पॅकेज ?

न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांमुळे सामान्य नागरिकांना अनेकदा वर्षानुवर्षे न्यायाची प्रतीक्षा करावी लागते. अशा परिस्थितीत न्यायव्यवस्थेतील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणं अत्यंत आवश्यक आहे. न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या मागण्यांपेक्षा न्यायालयीन कामकाजाला आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळायला हवं, हा मुद्दा सरन्यायाधीशांनी ठामपणे मांडला. न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी कामातील शिस्त, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व जपणं गरजेचं असल्याचाही या वक्तव्यातून संदेश मिळतो.

Exit mobile version