मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने मोठी घडामोड समोर आली आहे. उद्या अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत मुंबईतील आंदोलनाची तारीख आणि पुढील रणनीती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच प्रस्तावित मुंबई आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हाय कोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय मुंबईत आंदोलन करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
परवानगीशिवाय मुंबईत आंदोलन करता येणार नाही, मनोज जरांगे पाटलांना हाय कोर्टाचा स्पष्ट आदेश
आधी संबंधित यंत्रणेकडून परवानगी घ्या आणि त्यानंतरच मुंबईत आंदोलन करा, असे न्यायालयाने म्हटल्याची माहिती आहे.

Untitled Design 2026 09 11T163830.442