सोनिया गांधींचे आत्मचरित्र भारतात प्रकाशित करण्यापासून पेंग्विनची माघार; संपादकीय बदलांवरून वाद

Sonia Gandhi’s Autobiography सोनिया गांधींच्या आत्मचरित्राच्या भारतातील प्रकाशनातून कंपनीची माघार; संपादकीय बदलांवरून वाद निर्माण झाला.

Sonia Gandhi’s Autobiography

Sonia Gandhi’s Autobiography

Company Pulls Out of Publishing Sonia Gandhi’s Autobiography : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचं बहुप्रतीक्षित आत्मचरित्र ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) येत्या 10 नोव्हेंबरला प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात सोनिया गांधी यांनी त्यांच्या बालपणापासून ते राजीव गांधी यांच्यासोबतचा विवाह, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येनंतरचा काळ, गांधी कुटुंबातील आयुष्य आणि त्यांचा राजकीय प्रवास याबाबत अनेक आठवणी सांगितल्या आहेत. पंतप्रधानपदाची संधी असतानाही ते स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी का घेतला नाही, याबाबतही पुस्तकात भाष्य करण्यात आले आहे.

जयकुमार गोरेंना मोठा धक्का! भाऊ शेखर गोरे 1 सप्टेंबरला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

या आत्मचरित्राचे प्रकाशन अमेरिकेतील अल्फ्रेड ए. नॉफ (Alfred A. Knopf) या प्रकाशन संस्थेकडून करण्यात येणार आहे. ही संस्था पेंग्विन रँडम हाऊस इंडिया (Penguin Random House) समूहाचा भाग आहे. पुस्तकाची घोषणा झाल्यानंतर भारतातील प्रकाशनावरून मात्र काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने पुस्तक प्रकाशित करण्यापासून माघार घेतली असल्याचा दावा करण्यात आला.

नेमकं प्रकरण काय?

सोनिया गांधी यांच्या पुस्तकाबाबत काही वृत्तांमध्ये पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने पुस्तकातील काही संपादकीय बदल सुचवले होते आणि ते बदल स्वीकारण्यास सोनिया गांधी यांनी नकार दिल्यानंतर कंपनीने भारतात पुस्तक प्रकाशित करण्यापासून माघार घेतली, असा दावा करण्यात आला. त्यामुळे पुस्तकाच्या भारतातील प्रकाशनावरून चर्चा सुरू झाली.

सिप्लाच्या पुणे गोदामाचा परवाना रद्द; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

मात्र, या वृत्तांवर आता पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने स्पष्टीकरण दिलं आहे. भारतामध्ये ‘बिलॉन्गिंग’चे प्रकाशक पेंग्विन रँडम हाऊस इंडिया नाहीत, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. तसेच, सोनिया गांधी यांनी संपादकीय बदल स्वीकारले नाहीत म्हणून कंपनीने पुस्तक प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला, असं म्हणणंही योग्य नसल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

पेंग्विन रँडम हाऊस इंडिया काय म्हणतंय?

प्रकाशक म्हणून पुस्तकातील माहितीची तथ्य पडताळणी करणं आणि पुस्तकाच्या हितासाठी लेखकाला आवश्यक सूचना देणं ही आपली जबाबदारी असल्याचं पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने सांगितलं आहे. पुस्तकाच्या प्रकाशन प्रक्रियेत तथ्य पडताळणी आणि संपादकीय सूचना देणं ही नेहमीची प्रक्रिया असल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं.

तिबेटमध्ये पुन्हा धरण फुटल्याने नेपाळला धोका; महापुरानंतर नव्या संकटाचा इशारा, 450 जणांचा मृत्यू

महत्त्वाचं म्हणजे, सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आपण इच्छुक आणि उत्सुक होतो, असं पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ‘सोनिया गांधी यांनी बदल नाकारले म्हणून पेंग्विनने पुस्तक नाकारलं’ असा सरळ निष्कर्ष काढणं योग्य नसल्याचं कंपनीच्या निवेदनातून स्पष्ट होतं.

मात्र, सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा तपशील गोपनीय असल्याने त्यावर यापुढे कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पुस्तकाच्या भारतातील प्रकाशनाबाबत नेमकी काय चर्चा झाली, याचा संपूर्ण तपशील अद्याप समोर आलेला नाही.

Exit mobile version