Video : संसदेत बोलू दिलं नाही, राहुल गांधींची पत्रकार परिषद, गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप

राहुल गांधी यांच्या आरोपांनी संसदेत मोठा गोंधळ उडाला होता. आता त्यांनी पत्रकार परिषदेत याच आरोपांचा पुनरुच्चार केला आहे.

News Photo   2026 07 29T192236.851

संसदेत बोलू दिलं नाही, राहुल गांधींची पत्रकार परिषद, थेट गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) पत्रकार परिषद घेऊन एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत मोठे दावे करत बड्या नेत्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

राहुल गांधी यांनी लाठीचार्जविषयी गंभीर असे आरोप केले आहेत. त्याआधी त्यांनी संसदेतही केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याच आदेशाने विद्यार्थ्यांवर पॅलेट गनच्या मदतीने हल्ले करण्यात आले, असा दावा केला. राहुल गांधी यांच्या या दाव्यानंतर संसदेत मोठा गोंधळ उडाला होता. आता त्यांनी पत्रकार परिषदेत याच आरोपांचा पुनरुच्चार केला आहे.

लोकसभेत राहुल गांधींचा गंभीर आरोप; शिक्षण मंत्रालय नाही, RSS चालवतंय देशाची शिक्षण व्यवस्था

विद्यार्थ्यांवर पॅलेट गनच्या मदतीने हल्ला झाला. एका विद्यार्थ्याला डोळा गमवावा लागला. अमित शाहांच्या आदेशानेच हे हल्ले करण्यात आले. मी याबाबत विचारणा करणारे पत्र 25 जुलै रोजी लिहिलं. परंतु त्या प्रश्नाला उत्तर मिळालं नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाहा यांचा राजीनामा घ्यावा. शाहा यांना पदावरून हटवावं. पॅलेट गन वापरण्याचा आदेश कोणी दिला, याची चौकशी व्हावी. तसंच, या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत करावी, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली. अमित शाहा हे नरेंद्र मोदी यांच्या सर्वात जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात.

Exit mobile version