गोकुळच्या चार संचालकांच्या नियुक्तीवर फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; शिंदे-पवारांची संमती होती का?

गोकुळच्या चार संचालकांच्या नियुक्तीवरून राजकीय वाद सुरू असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या खुलाशाने नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे.

News Photo   2026 11 07T163723.238

Gokul Director Appointment

Gokul Director Appointment : गोकुळमध्ये राज्य सरकारने चार संचालक नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. या निर्णयावर शिंदे गटाने नाराजी व्यक्त करत गोकुळमध्ये राजकारण करू नये आणि जनमताचा कौल मान्य करावा, अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे या निर्णयावरून सत्ताधारी पक्षांमध्येच मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली होती.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत मोठा खुलासा केला आहे. गोकुळमधील चार संचालकांच्या नियुक्तीचा निर्णय एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या संमतीनेच घेण्यात आला होता, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवं राजकीय वळण मिळालं आहे.

Exit mobile version