माझ्या बरबादीसाठी बसलेल्यांना हवा बदलल्याचं कळणारही नाही; दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे कडाडले

भगवान गडावरील दसरा मेळाव्यात धनंजय मुंडेंनी शायरीतून केलेल्या सूचक विधानामुळे राजकीय चर्चेला नवा विषय मिळाला आहे.

News Photo   2026 10 20T160749.755

Dhananjay Munde Dussehra Rally

Dhananjay Munde Dussehra Rally : मराठवाड्यात दुष्काळाचं संकट गडद झालेलं (Melava) असताना भगवान गडावरील पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. गेल्या वर्षापासून धनंजय मुंडे या मेळाव्याला उपस्थित राहत आहेत. यंदा ते भाषणासाठी उभे राहताच उपस्थितांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणाले, यामुळेच आपलं वाटोळं झालं रे. सध्या चर्चेत असलेल्या धनंजय मुंडेंनी दुष्काळाच्या परिस्थितीचाही उल्लेख केला. महायुती सरकार शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत पोहोचवेल, असं सांगत कोणत्याही घटकावर संकट आलं तर आपण आणि पंकजा मुंडे त्यांच्या पाठीशी उभे राहतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.

गोपीनाथ मुंडे यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी जिल्ह्यात विकासाची गंगा आणली, तर पंकजा मुंडे यांनाही संधी मिळाल्यावर त्यांनी विकासकामं केली, असं धनंजय मुंडे म्हणाले. ऊसतोड कामगारांसाठी आपण अनेक निर्णय घेतले, तरीही आपल्याला टीकेचा सामना करावा लागतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कधी पंकजा मुंडे यांच्यावर टीका होते, तर कधी आपल्याला लक्ष्य केलं जातं, असं सांगत मागील दसरा मेळाव्यात आणि आताच्या भाषणातच आपण व्यक्त झालो असून इतरत्र कुठेही बोललो नसल्याचं त्यांनी नमूद केलं.

ठोकरें कहती हैं मारा जाएगा, पर हौसले कहते हैं देख लेंगे; भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा हुंकार

“तुम्ही कितीही बोला, पण मी बोलणार नाही,” असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दाखवलं. यावेळी त्यांनी शायरीच्या माध्यमातूनही आपली भावना व्यक्त केली. “हवा मचल रही हैं, इन दिनों हवा तेज चल रही हैं. कुछ महफिलें ऐसे बैठी हैं मेरी तबाही के लिये, उन्हें मालूम ही नहीं हवा रुख बदल रही हैं,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना संदेश दिला. त्यांच्या या शायरीची आणि भाषणातील विधानांची सध्या चर्चा होत आहे.

महायुतीचा आमदार म्हणून आपण आणि पंकजा मुंडे जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. शेतकरी आणि ऊसतोड कामगारांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. कोणत्याही व्यक्तीला किंवा घटकाला अडचण आली, तर त्याच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका आपण कायम ठेवली आहे, असंही ते म्हणाले. विकासासाठी संधी मिळाली तेव्हा काम केलं, मात्र बरंच काही सहन करावं लागलं, अशी भावना व्यक्त करत त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.

Exit mobile version