स्वर्गीय विनायक आबा निम्हण यांच्या जयंतीनिमित्त खडकी पोलीस स्टेशनला संगणकीय साहित्याचे वितरण

Sunny Nimhan: पोलीस प्रशासनाला आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देणे हीदेखील समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी आहे

Nihaman

Nihaman

पुणे: कार्यसम्राट आमदार स्व. विनायकआबा निम्हण (Vinayak Nimhans) यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाउंडेशन (someshwar foundation) व शिवसंकल्प प्रतिष्ठान यांच्या वतीने खडकी पोलीस स्टेशनला समाजोपयोगी उपक्रमांतर्गत लॅपटॉप, संगणक, टॅबलेट, प्रिंटर आदी संगणकीय साहित्याचे वितरण करण्यात आले आहे.

पोलिस प्रशासनाचे दैनंदिन कामकाज अधिक अद्ययावत, गतिमान आणि तंत्रज्ञानस्नेही होण्यासाठी आवश्यक असलेले हे संगणकीय साहित्य खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. स्वर्गीय विनायक आबा निम्हण यांनी कायमच समाजाच्या गरजा ओळखून विविध क्षेत्रांना मदतीचा हात दिला. त्यांची सामाजिक कार्याची परंपरा पुढे नेत समाजाच्या गरजेनुसार उपक्रम राबविणे, हा आमचा प्रयत्न आहे. पोलीस प्रशासनाला आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देणे हीदेखील समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी आहे, असे नगरसेवक सनी निम्हण (Sunny Nimhan)
यांनी सांगितले.

आजच्या डिजिटल युगात पोलीस प्रशासनाचे कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी संगणकीय साधनांची आवश्यकता मोठी आहे. खडकी पोलीस स्टेशनला आवश्यक साहित्य उपलब्ध करून देताना प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजात त्याचा प्रत्यक्ष उपयोग व्हावा आणि नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे, असे माजी शिक्षण मंडळ सदस्य अमित मुरकुटे यांनी सांगितले.

या उपक्रमाबद्दल बोलताना खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम म्हणाले, पोलीस स्टेशनच्या दैनंदिन कामकाजामध्ये संगणक, लॅपटॉप, टॅबलेट आणि प्रिंटर यांसारख्या साधनांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. विविध शासकीय नोंदी, अहवाल, पत्रव्यवहार, तपासाशी संबंधित कागदपत्रे तसेच नागरिकांशी संबंधित कामकाज अधिक जलद आणि अचूक पद्धतीने करण्यासाठी या साहित्याची निश्चितच मोठी मदत होणार आहे. सामाजिक संस्थांनी पोलीस प्रशासनाच्या गरजा लक्षात घेऊन केलेले हे सहकार्य आमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पोलीस प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजाला अधिक गती व कार्यक्षमता मिळावी, तसेच नागरिकांना अधिक प्रभावी आणि तत्पर सेवा देण्यास मदत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. पोलीस प्रशासनाच्या गरजा लक्षात घेऊन संगणकीय साहित्य उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या प्रसंगी नगरसेवक सनी निम्हण, माजी शिक्षण मंडळ सदस्य अमित मुरकुटे, आकाश अग्रवाल, अम्मार इनामदार, राहुल तावरे, योगेश जाधव यांच्यासह सोमेश्वर फाउंडेशन व शिवसंकल्प प्रतिष्ठानचे इतर पदाधिकारी तसेच पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्व. विनायकआबा निम्हण यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन समाजहितासाठी सातत्याने योगदान देण्याची परंपरा पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. समाजाच्या गरजा लक्षात घेऊन शिक्षण, प्रशासन, सामाजिक सेवा आणि विविध क्षेत्रांना आवश्यक ते सहकार्य करण्याचा सोमेश्वर फाउंडेशनचा संकल्प या उपक्रमातून अधिक दृढ करण्यात आला.

Exit mobile version