पाऊस, पूर आणि भूस्खलनाचा फटका; नागरिकांसाठी डीओटीने सुरू केली आपत्कालीन नेटवर्क सुविधा

बचावकार्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी दूरसंचार विभागाने प्रभावित भागांमध्ये तातडीने इंट्रा सर्कल रोमिंग सेवा लागू केली आहे.

Untitled Design (100)

Untitled Design (100)

Emergency network facility : देशातील अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे दूरसंचार सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांना संपर्कात राहता यावे आणि बचावकार्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी दूरसंचार विभागाने प्रभावित भागांमध्ये तातडीने इंट्रा सर्कल रोमिंग सेवा लागू केली आहे. या सुविधेमुळे एखाद्या मोबाईल कंपनीचे नेटवर्क बंद पडल्यास ग्राहकांचा फोन आपोआप त्या परिसरात उपलब्ध असलेल्या दुसऱ्या दूरसंचार कंपनीच्या नेटवर्कशी जोडला जाणार आहे.

सततच्या पावसामुळे आणि भूस्खलनामुळे नागालँड, गुजरात तसेच दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दीव या भागांतील दूरसंचार यंत्रणांचे मोठे नुकसान झाले आहे. गुजरातमधील वलसाड, सिल्वासा आणि दमण-दीव परिसरातील महत्वाचे नेटवर्क नोड्स बंद पडल्याने अनेक मोबाईल सेवा प्रभावित झाल्या आहेत. नागालँडमधील मोन आणि लॉन्गलेन्ग जिल्ह्यांमध्ये ऑप्टिकल फायबर केबल तुटल्यामुळे मोबाईल आणि इंटरनेट देवा खंडित झाल्या आहेत. तर जम्मू-काश्मीरमधील मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे फायबर नेटवर्कचे नुकसान होऊन कॉलिंग आणि इंटरनेट सेवांवर परिणाम झाला आहे.

आपण काय करू शकतो याचा अंदाज सगळ्यांनाच…पोलिसांचा उल्लेख करत राज ठाकरेंची पुन्हा एक पोस्ट

आपत्तीच्या काळात संपर्क व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी दूरसंचार विभागाने 2020 च्या मानक कार्यपद्धतीनुसार आणि एकत्रित परवान्याच्या नियमांनुसार आयसीआर सेवा लागू केली आहे. विभागाच्या निर्देशानुसार ही सुविधा 27 जुलै 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे. या सुविधेअंतर्गत एखाद्या ग्राहकाच्या मोबाईल सेवा पुरवठादाराचे नेटवर्क उपलब्ध नसल्यास त्याचा फोन त्या भागातील उपलब्ध दुसऱ्या कंपनीच्या नेट्वर्कशी आपोआप जोडला जाईल. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, आरोग्य कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांना मदत व बचाव कार्यादरम्यान अखंड संपर्कात राहणे शक्य होणार आहे.

पोलिओ, गरिबी आणि संघर्षावर मात; झंडू कुमारने कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला मिळवून दिलं पहिलं पदक

दूरसंचार विभागाने स्पष्ट केले आहे की या सेवेचा लाभ घेण्यासाठी मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक नेटवर्क सिलेक्शन सुरू असणे आवश्यक आहे. जर फोन आपोआप दुसऱ्या नेटवर्कशी जोडला गेला नाही, तर वापरकर्त्यांनी मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये जाऊन मोबाईल नेटवर्क किंवा कनेक्शन पर्याय निवडावा. त्यानंतर नेटवर्क ऑपरेटर्समध्ये जाऊन ऑटोमॅटिक नेटवर्क सिलेक्शन सुरू करावे. तरीही नेटवर्क मिळत नसेल, तर मॅन्युअल पर्याय निवडून स्क्रीनवर दिसणाऱ्या उपलब्ध नेटवर्कपैकी कोणतेही नेटवर्क निवडता येईल. यामुळे आपत्तीच्या काळातही मोबाईल सेवा, कॉलिंग आणि इंटरनेट सुविधा सुरू ठेवणे शक्य होणार आहे.

पूर, भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचा संपर्क तुटू नये आणि मदतकार्य सुरळीतपणे पार पडावे यासाठी दूरसंचार विभागाची ही विशेष व्यवस्था महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Exit mobile version