नक्षलवाद संपला, आता विकासाचा नवा अध्याय, गडचिरोलीत फडणवीसांची मोठी घोषणा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षाचा आणि आदिवासी समाजाच्या ऐतिहासिक योगदानाचा गौरव केला.

Untitled Design   2026 11 15T122102.239

Untitled Design 2026 11 15T122102.239

Fadnavis makes a major announcement in Gadchiroli! : भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जनजातीय गौरव दिनानिमित्त आयोजित या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी बांधवांना संबोधित करत त्यांच्या विकासासाठी सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन माध्यमातून उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोलीच्या विकासाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षाचा आणि आदिवासी समाजाच्या ऐतिहासिक योगदानाचा गौरव केला. ते म्हणाले की, संपूर्ण भारतातील जनजातीय गौरव दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा मान महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याला मिळाला, ही अभिमानाची बाब आहे. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

आदिवासी समाजाचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजातील अनेक नायकांनी मोठा संघर्ष केला. मात्र, त्यांचा इतिहास आणि योगदान अपेक्षित प्रमाणात शिकवले गेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचा हा गौरवशाली इतिहास देशासमोर आणण्याचे काम झाले आहे, असे फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रात थंडीचा अलर्ट! पहाटे धुक्याची चादर, रात्री गारठा वाढणार, हवामान विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन

भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाचा स्वाभिमान जागृत करण्याचे काम केले. ब्रिटिशांनी आदिवासींचे अस्तित्व आणि संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र बिरसा मुंडा यांनी त्याविरोधात संघर्ष करत समाजाला स्वाभिमानाची जाणीव करून दिली. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, सरकारच्या विविध योजनांचा लाभ आता दुर्गम भागातील आदिवासी गावांपर्यंत पोहोचत आहे. शिक्षण, रोजगार आणि विकासाच्या माध्यमातून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारने राबवलेल्या विकास योजनांमुळे नक्षलवाद संपुष्टात आल्याचा दावाही त्यांनी केला.

गडचिरोली जिल्ह्याने आता विकासाच्या दिशेने मोठी वाटचाल सुरू केली असून, या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आदिवासी समाजाला संबोधित केले. भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करत त्यांनी जनजातीय गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. एकनाथ शिंदे म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा हे केवळ आदिवासी समाजाचे नेते नव्हते, तर ते समाजाच्या स्वाभिमानाचे प्रतीक होते. लुबाडणूक, फसवणूक आणि धर्मांतराच्या विरोधात त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या कार्याला आणि बलिदानाला कोटी कोटी वंदन.

आदिवासी समाजाच्या विकासासाठी सरकारकडून विविध उपक्रम राबवले जात असून, दुर्गम भागातील शेवटच्या घरापर्यंत विकास पोहोचवण्याचे काम सुरू आहे. आदिवासींच्या विकासात अडथळा ठरणाऱ्या नक्षलवादाला संपवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाले असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. गडचिरोली हा आता विकासाच्या प्रवाहापासून दूर असलेला जिल्हा राहणार नाही. उलट, भविष्यात हा जिल्हा विकासाचा पहिला जिल्हा म्हणून ओळखला जाईल. आधुनिक विकासाची कामे सरकारकडून वेगाने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आधीच महागाईने हैराण, त्यात सीएनजी दरवाढीचा आणखी एक झटका! मुंबईत प्रतिकिलो दर 91.50 रुपयांवर

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन माध्यमातून या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. आदिवासी बांधवांनीही आपल्या समस्या आणि अपेक्षा पंतप्रधानांसमोर मोकळेपणाने मांडल्या. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना सुचवत संवाद साधला. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यात आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, सामाजिक विकास, शिक्षण, नक्षलवाद आणि गडचिरोलीच्या भविष्यातील विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. आता सरकारच्या विकास योजनांचा लाभ दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत कितपत पोहोचतो, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Exit mobile version