फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणाऱ्या महत्वपूर्ण बैठकीसाठी आज मुंबई येथे आगमन झालं. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॅक्रॉन तसंच त्यांच्या पत्नी ब्रिगिट यांचं स्वागत केलं.
आज मंगळवारी (दि. १७) पंतप्रधान नरेंद्र मोदी व अध्यक्ष मॅक्रॉन यांची महाराष्ट्र लोकभवन येथे महत्वपूर्ण बैठक होत आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान मोदी व मॅक्रॉन हे गेटवे ऑफ इंडिया येथे होत असलेल्या ‘इंडिया – फ्रांस यिअर ऑफ इनोव्हेशन अँड कल्चरल कमेमोरेशन’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर, अनेक ठिकाणी वाहतूक मार्ग बंद
मॅक्रॉन यांच्या मुंबई आगमन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल व वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. दरम्यान, या सगळ्या दौऱ्यात मुंबईतील अनेक ठिकाणचे मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीची शक्यता निर्माण झाली आहे.
पूर्णपणे बंद असलेले मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज मार्ग
श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (फक्त आपत्कालीन वाहनांसाठी सुरू)
नॉर्थ कोर्ट ते अॅडम स्ट्रीट जंक्शनपर्यंतचा पी. रामचंदानी मार्ग
रिगल जंक्शनकडे येणाऱ्या वाहनांसाठी शहीद भगतसिंग मार्ग
महाकवी भूषण रोड
पी. रामचंदानी मार्गावरील अल्वा चौक
रेडिओ क्लब परिसर
अॅडम स्ट्रीट आणि पी. रामचंदानी मार्गावरील टॅक्सी स्टँड व BEST बस थांबे
वाहतूक वळवण्यात आलेले मार्ग
महाकवी भूषण रोडवरील वाहतूक बीके बोमन बेहराम रोडकडे वळवली
रेडिओ क्लब परिसरातील वाहतूक हाजी नियाज आझम रोड व जगन्नाथ पालव चौक मार्गे वळवली
वेळ: दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत नियम लागू
