Download App

FYJC म्हणजेच ११वीच्या प्रवेश प्रक्रियेची अंतिम मेरिट लिस्ट जाहीर

Maharashtra FYJC merit list 2025 result released: यंदा महाराष्ट्रातील ९,४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये (FYJC) २१ लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत १८ लाख ९७ हजार आणि २ लाख २५ हजार जागा विविध कोट्यांतर्गत राखीव आहेत. अशा एकूण २१ लाख २३ हजार जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं आज, ११ जून २०२५ रोजी ही यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली आहे. चला तर मग जाणून घेऊया ही मेरिट लिस्ट तुम्हाला कशी तपासायची?

सावधान! मुंबई-पुण्यात ‘कोसळ’धार, ‘या’ 13 जिल्ह्यांत अतिमुसळधार; हवामान विभागाचा अलर्ट

स्टेप्स:
1) अधिकृत वेबसाइट mahafyjcadmissions.in या पोर्टलवर जा.
2) तुमचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाका लॉगिन करा.
3) मुख्यपृष्ठावरील ‘FYJC मेरिट सूची २०२५’ या लिंकवर क्लिक करा.
4) यादीतून तुमचे नाव, अर्ज क्रमांक किंवा रोल नंबर शोधा.
5) डाउनलोड करा आणि भविष्यासाठी जतन करा.

मान्सूनमध्येही ट्विस्ट! मोसमी वारे दडी मारणार? 6 जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट असतानाच हवामानात मोठा बदल

विद्यार्थ्यी मित्रांनो, तुमच्या आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन नवा प्रवास सुरू करण्याची हीच ती योग्य वेळ! शिक्षणाच्या या नव्या टप्प्यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

follow us

संबंधित बातम्या