गोकुळकडूनही दूध दरवाढीचे संकेत; पुढील आठवड्यात निर्णय, नवे अध्यक्ष सतेज पाटलांबद्दल बोलले

Gokul Milk Price Hike : गोकुळच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी बुधवारपर्यंत दूध दरवाढीची घोषणा होणार असल्याचे चेअरमन राजेश पाटील यानी सांगितले.

News Photo   2026 11 14T164450.460

Gokul Milk Price Hike

Gokul Milk Price Hike : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (Gokul) संघ अर्थात गोकुळच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Gokul ) आनंदाची बातमी आहे. दूध उत्पादकाना मिळणाऱ्या दरात वाढ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून येत्या बुधवारपर्यंत दरवाढीची घोषणा केली जाणार आहे. गोकुळचे चेअरमन राजेश पाटील यानी संचालक मंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आता गोकुळच्या नव्या दराकडे लागले आहे.

अमूल आणि मदर डेअरी या प्रमुख दूध कंपन्यानी अलीकडेच दूध दरात वाढ केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दरवाढीच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. मुंबईतील दूध वितरकांशी चर्चा केल्यानंतर विक्री दराबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. दूध उत्पादकांचे आर्थिक हित आणि ग्राहकांवरील संभाव्य भार या दोन्ही बाबींचा विचार करून पुढील आठवड्यात दरवाढ जाहीर केली जाईल, असे राजेश पाटील यानी स्पष्ट केले.

Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

दरम्यान, गोकुळ संघाला मागील सहा महिन्यांत झालेल्या आर्थिक तोट्याचाही मुद्दा बैठकीत चर्चेला आला. हा तोटा नेमका कोणत्या कारणांमुळे झाला आणि त्यावर कोणत्या उपाययोजना करता येतील, याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे दूध दरवाढीच्या निर्णयासोबतच संघाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठीही संचालक मंडळाकडून प्रयत्न केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आजच्या बैठकीला गोकुळचे सर्व संचालक उपस्थित होते. सर्व संचालकानी एकत्रितपणे बैठकीला हजेरी लावल्याबद्दल चेअरमन राजेश पाटील यानी समाधान व्यक्त केले. या उपस्थितीबद्दल आभार मानण्यासाठी आपण आमदार सतेज पाटील यानाही फोन करणार असल्याचे त्यानी सांगितले. आता गोकुळकडून बुधवारपर्यंत होणाऱ्या दूध दरवाढीच्या घोषणेकडे उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version