मराठा आंदोलकाचा अंतरवाली सराटीत मृत्यू; नेमकं काय घडलं!

Maratha Protester Dies दशरथ रायकर या मराठा आंदोलकाचा अंतरवाली सराटीतच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने आंदोलनस्थळी खळबळ उडाली आहे.

Maratha Protester Dies

Maratha Protester Dies

Maratha Protester Dies at Antarwali Sarati : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange) आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे. जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी राज्याच्या अनेक भागातून मराठा बांधव (Maratha Protester) अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. मात्र या आंदोलनादरम्यान दशरथ रायकर (Dashrath Raikar) या मराठा आंदोलकाचा अंतरवाली सराटीतच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने आंदोलनस्थळी खळबळ उडाली आहे.

युट्यूबर संतोष पंडित अटकेत; चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह व्हिडीओ करणं भोवलं

झालं असं की, दशरथ रायकर हे मराठा आंदोलक बीड (Beed) जिल्ह्यातील संगम येथील राहिवासी आहेत. जरांगेंनी मराठा बांधवांना आंदोलनासाठी अंतरवाली सराटीत येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अनेक मराठा आंदोलकांप्रमाणेच दशरथ रायकर हेही जरांगेंना पाठींबा देण्यासाठी अंतरवाली सराटीला गेले.

भाजपच्या नगरसेविकेची धमकी; मी ‘त्याला’ जिवंत जाळणार, नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहीतीनुसार काल रात्री उशीरा ते अंतरवालीतील एका शेतात झोपले हाते. परंतू सकाळी बराच वेळ झाला तरी ते झोपेतून उठलेच नाहीत. त्यांची प्रकृती पाहता तेथील उपस्थित मराठा बांधवांनी त्यांना अंबड येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मोठी बातमी! जरांगे पाटील उपोषण सोडणार?, शिष्टमंडळातील प्रसाद लाड भेटीला, काय केलं आवाहन?

प्राथमिक माहितीनुसार दशरथ रायकर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे अंतरावली सराटीत दाखल झालेल्या आंदोलकांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version