“बंडू जाधवनं लय मोठी चूक केली, आता…” जरांगे भडकले!

Manoj Jarange on Sanjay Jadhav बंडू जाधव आता तुझ्या राजकारणाला अवकळा लागली समज, कार्यक्रम रद्द न करण्यावरुन जरांगे भडकले.

Manoj Jarange on Sanjay Jadhav

Manoj Jarange on Sanjay Jadhav

Manoj Jarange on Sanjay Jadhav: परभणीतील नियोजित शेतकरी मेळावा रद्द करण्यास खासदार संजय जाधव ऊर्फ बंडू जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी नकार दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या सांगण्यावरून कार्यक्रम रद्द न करण्याचा निर्णय घेऊन बंडू जाधव यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील मोठी चूक केली असल्याचा दावा जरांगे यांनी केला. रविवारी अंतरवाली सराटी (Antarvali Sarati) येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी बंडू जाधव यांच्यासह एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांच्यावरही निशाणा साधला.

‘इंडियाज गॉट लेटंट’मुळे समय रैना पुन्हा वादात; काश्मिरी पंडितांवरील कथित विनोदावर राम कदम आक्रमक

जरांगे पाटील यांनी यापूर्वी संजय जाधव यांना फोन करून एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणारा शेतकरी मेळावा रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून नागरिकही दाखल झाल्याने मेळावा रद्द करणे शक्य नसल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. त्यानंतर जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली.

मेळावा रद्द करणार नाही; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतरही संजय जाधव ठाम

“संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे यांचं ऐकून बंडू जाधव यांनी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे. तुझं राजकीय अस्तित्व मराठा समाजाने उभं केलंय, हे विसरू नकोस. कार्यक्रम घेणं हे तुझं अस्तित्व नव्हतं, तर मराठा समाजाला सांभाळणं हे तुझं अस्तित्व होतं. आता तुझ्या राजकारणाला अवकळा लागली समज,” असा घणाघात जरांगे यांनी केला.

‘तुमच्यामुळे राज्यातील वातावरण खराब होईल’

यावेळी जरांगे यांनी संजय जाधव यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची टीकाही केली. जाधव यांच्याकडे समर्थक किंवा कार्यकर्ते असले तरी त्याच्या जोरावर राजकारण चालत नसल्याचे ते म्हणाले. तसेच जाधव यांच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांचीही राजकीय अडचण वाढल्याचा दावा त्यांनी केला.

‘मेळावा रद्द करा, नाहीतर उपोषण सोडून परभणीत येईन’; संजय जाधवांना जरांगेंनी खडसावलं!

“तू शिरसाटांचं ऐकून शेतकऱ्यांच्या आडून मराठ्यांच्या उरावर नाचला आहेस. आता याची परतफेड होणार,” असा इशारा जरांगे यांनी दिला.

‘12 तारखेला तारीख जाहीर करणार’

मनोज जरांगे पाटील यांनी आगामी आंदोलनाबाबतही मोठा इशारा दिला. “12 तारखेला आमची तारीख जाहीर होणार आहे. एकनाथ शिंदेंनी आव्हान दिलं, ते मी स्वीकारतो. त्याची परतफेड मुंबईत करू,” असे जरांगे यांनी म्हटले.

‘मतदारसंघात कार्यक्रम घेऊ नका’

बंडू जाधव यांच्याशी असलेल्या जुन्या संबंधांचाही जरांगे यांनी उल्लेख केला. आतापर्यंत त्यांच्यावर प्रेम केले आणि त्यांच्या राजकीय वाटचालीत साथ दिली, मात्र आता त्यांनी मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप जरांगे यांनी केला.

17 दिवसांचं उपोषण अखेर स्थगित; आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारकडून मान्य

“तुझ्यासाठी जीवाचं रान केलं. मात्र आता तू मराठ्यांच्या उरावर नाचतोस का? मतदारसंघात अजिबात कार्यक्रम घेऊ नको. शिरसाट आणि तू षडयंत्र रचलं आहेस,” असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे परभणीतील शेतकरी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बंडू जाधव यांच्या भूमिकेनंतर जरांगे पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version