जरांगेंचा अंतिम निर्णय; ‘मराठ्यांनो, उद्या अंतरवालीत या!’ उपोषण सुरू…

Manoj Jarange मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार; मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई आंदोलनाचा इशारा.

Manoj Jarange

Manoj Jarange

Manoj Jarange to Begin Hunger Strike on August 29: मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर आता जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे. त्यांच्या घोषणेनुसार 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे ते उपोषणाला बसणार आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी मराठा समाजातील नागरिकांना मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

माजी अग्निवीरांसाठी मोठा निर्णय; 1000 माजी अग्नीवीर राज्य सरकारच्या सेवेत घेणार

सरकारला दिलेली मुदत संपली

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ठरावीक मुदत दिली होती. मात्र, ही मुदत आता संपली असून त्यांच्या मागण्यांबाबत अपेक्षित निर्णय झालेला नसल्याने त्यांनी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. “सरकार मराठ्यांचं वाटोळं करत आहे. आरक्षणाच्या नावावर सरकार लाडीगोडी लावत आहे,” असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.

29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत उपोषण

जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी अंतरवाली सराटीत तयारी सुरू करण्यात आली आहे. 29 ऑगस्टपासून उपोषण सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या आंदोलनात मराठा समाजाने सहभागी होऊन आपला पाठिंबा दर्शवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जयकुमार गोरेंना मोठा धक्का! भाऊ शेखर गोरे 1 सप्टेंबरला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

दरम्यान, मागण्यांवर सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

‘मुंबईकडे जाणार’

“सरकारने दिलेल्या वेळेत मराठा आरक्षणाच्या मागणीवर निर्णय घेतला नाही आणि मी उपोषण करता-करता मेलो तर मला मराठ्यांनी मुंबईकडे घेऊन जावं”, असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे सरकार जरांगे यांच्या मागण्यांवर काय भूमिका घेते आणि आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी कोणती पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी

जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला अंतरवाली सराटीत येण्याचे आवाहन केल्याने मोठ्या संख्येने आंदोलक दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांकडूनही परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

देशाचा मूड काय?, पंतप्रधानपदासाठी सर्वात जास्त पसंती कुणाला?, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? तिसरा नेता कोण?

मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Exit mobile version