मोठी बातमी: मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले

Maratha Protesters परभणीत संजय जाधव यांच्या शेतकरी मेळाव्याला मराठा आंदोलकांचा विरोध; घोषणाबाजीनंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

Maratha Protesters

Maratha Protesters

Maratha Protesters Detained in Parbhani: परभणीतील खासदार संजय जाधव ऊर्फ बंडू जाधव (Sanjay jadhav) यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यावरून वाद पेटला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी या कार्यक्रमाला विरोध करत तो रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, जाधव यांनी कार्यक्रम रद्द करण्यास नकार दिल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.

नाथाभाऊंच्या मनात दडलं काय? राजकीय प्रवासाच्या आठवणींना उजाळा; अमृत महोत्सवात खडसेंच्या भावनांचा बांध फुटला

जरांगे यांच्या भूमिकेनंतरही कार्यक्रम सुरू राहणार असल्याने आंदोलकांनी परभणीतील शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी करत विरोध दर्शवला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी काही मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, या शेतकरी मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदे नांदेड विमानतळावर दाखल होणार असून, विमानतळाबाहेरही मराठा आंदोलकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

मेळावा रद्द करणार नाही; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतरही संजय जाधव ठाम

“संजय जाधव यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी कार्यक्रम घेऊन दाखवावा,” असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे शेतकरी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर परभणीत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Exit mobile version