सिल्लोडचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. नफिसा बेगम या अनेक वर्षांपासून सिल्लोडच्या सक्रिय राजकारणात होत्या. मात्र, त्यांचे निधन नेमके कोणत्या कारणाने झाले, याबाबत काही माहिती पुढे येऊ शकली नाही. नफिसा बेगम या सिल्लोड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, नफिसा बेगम यांच्या पार्थिवावर सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. नफिसा बेगम यांच्या निधनाने कुटुंबियांना अत्यंत मोठा धक्का बसला. अब्दुल सत्तार हे मराठवाड्यातील मोठे नेते आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळाले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार यांना स्थान मिळू शकले नाही.
