जिल्हा बँक! संगमनेरच्या बैठकीत काहींची गैरहजेरी…आमदार जगतापांनी सांगितले कारण

बैठकीला भाजपचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तसेच खासदार निलेश लंके हे अनुपस्थित होते यावरून तर्क वितर्क लावले जाऊ लागले.

Untitled Design   2026 10 01T122711.255

Untitled Design 2026 10 01T122711.255

MLA Jagtap stated the reason : जिल्हा बँक निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी संगमनेर येथे बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. मात्र या बैठकीला भाजपचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तसेच खासदार निलेश लंके हे अनुपस्थित होते यावरून तर्क वितर्क लावले जाऊ लागले. दरम्यान आता यावर बोलताना अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार जगताप बोलताना म्हणाले की त्या बैठकीला बहुतांश नेते हे उपस्थित होते. जे तालुकास्तरावर ती निवडणुकीत भाग घेणारे नेते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. बहुतांश लोकांना निरोप दिलेला होता. मात्र या बैठकीला आमदार मोनिका राजळे चंद्रशेखर घुले ही नव्हते. मात्र त्यांच्याशी देखील सुजय विखे हे बोलणार होते. तसेच काहीशी हे बाळासाहेब थोरात हे देखील बोलणार होते. मात्र बैठक अचानक ठरले असल्याने सगळेजण उपस्थित राहू शकले नाही.

Flydubai Flight : हल्ला करणाऱ्या वैमानिकाचा गळा दाबला, बाहेर ओढलं…इस्रायली नागरिकाने थरार सांगितला

मात्र जरी बैठकीला उपस्थित नसल्या तरी फोन द्वारे त्यांच्याशी संवाद झाला असेल असा यावेळी जगताप म्हणाले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की निवडणुकीतील जागा वाटपाबाबत शेवटच्या क्षणापर्यंत ही प्रक्रिया सुरू असते. जागा वाटप बाबत अद्याप पर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र बँक ही बिनविरोध झाली पाहिजे या निर्णयापर्यंत हे बहुतांश नेते पोहोचलेले आहेत.

दरम्यान पूर्वी ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे स्थान होते जेवढे प्रतिनिधी राष्ट्रवादीचे होते. तेवढेच प्रतिनिधी राहतील यासाठी आमच्या सर्वांचे प्रयत्न आहे. ज्या पद्धतीने या निवडणुकींवरती पूर्वी दिवंगत नेते अजित पवार यांचे लक्ष होते. त्याच पद्धतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांचे लक्ष यांचे लक्ष असणार आहे व सर्वांची स्थान अबाधित राहील असाच निर्णय होईल असे महत्त्वाचे प्रतिक्रिया यावेळी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

Exit mobile version