Nana Patekar’s daring feat of patriotism : आज पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी वयाच्या 75 व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन झाल्याची बातमी समोर आली आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीसह त्यांच्या असंख्य चाहत्यांवर शोककळा पसरली. आपल्या दमदार अभिनयाने रुपेरी पडदा गाजवणाऱ्या नाना पाटेकर यांच्या आयुष्यातील एक वेगळं पैलू म्हणजे त्यांची देशसेवेची तळमळ. 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कारगिल युद्ध सुरू असताना त्यांनी अभिनयाचे व्यस्त वेळापत्रक आणि चित्रपटांचे चित्रीकरण बाजूला ठेवत थेट सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांची भेट घेऊन लष्करासोबत काम करण्याची परवानगी मागितली.
नाना पाटेकर यांना कमांडो प्रशिक्षण तसेच रायफल शूटिंगचा अनुभव असल्याने त्यांना विशेष परवानगी देण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर त्यांनी मराठा लाईट इन्फंट्रीसोबत मानद मेजर म्हणून काम केले आणि नियंत्रण रेषेजवळील द्रास, लेह, कुपवाडा, बारामुल्ला आणि सोपोर यांसारख्या संवेदनशील भागांत जवळपास 60 दिवस जवानांसोबत घालवले. युद्धकाळात ते लष्कराच्या क्विक रिअॅक्शन टीमशी देखील जोडले गेले होते. अचानक उद्भवणाऱ्या शत्रूच्या हालचालींना तातडीने प्रत्युत्तर देणाऱ्या या पथकासोबत त्यांनी गस्त घातली, जवानांसोबत बंकरमध्ये वास्तव्य केले आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले. युद्धात जखमी झालेल्या जवानांना भेटण्यासाठी ते लष्करी रुग्णालयातही जात होते.
विश्वनाथ पाटेकर ते नाना पाटेकर… हा प्रवास होता संघर्षातून घडलेल्या एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचा
सीमेवरील कठीण हवामान, युद्धाचा ताण आणि प्रतिकूल परिस्थितीचा त्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम झाला आणि या काळात त्यांचे सुमारे 15 ते 20 किलो वजन कमी झाल्याचे सांगितले जाते. मात्र, या सर्व परिस्थितीत देखील ते जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रहार चित्रपटात मेजर प्रताप चौहान यांची भूमिका साकारताना त्यांनी घेतलेले लष्करी प्रशिक्षण देखील त्यांच्या या प्रत्यक्ष अनुभवत उपयोगी ठरले. नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत जवानांविषयी बोलताना, आमचे जवान हेच देशाचे खरे नायक आहेत, अशी भावना व्यक्त केली होती. जवानांसोबत घालवलेले ते दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे दिवस असल्याचे देखील त्यांनी संगीतीतले होते.
त्यामुळे नाना पाटेकर यांची ओळख केवळ एक महान अभिनेता म्हणूनच नव्हे, तर देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द असलेला संवेदनशील आणि धाडसी माणूस म्हणूनही कायम स्मरणात राहील. पडद्यावर ‘क्रांतिवीर’ आणि ‘प्रहार’सारख्या भूमिकांमधून देशप्रेमाची भावना जागवणारा हा अभिनेता प्रत्यक्ष आयुष्यातही जवानांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला. म्हणूनच नाना पाटेकरांचा हा देशसेवेचा पैलू त्यांच्या अभिनयाइतकाच प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरतो.
