Person who threatened Jitendra Awhad taken into custody in Pune landlord identified accused’s actions : मुंबईतील जुहूच्या पुष्पा पार्क परिसरात (Mumbai) अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना देखील अर्वाच्या भाषेत बोलून मारण्याची धमकी देणारे कल आणि मेसेज आल्याची माहिती स्वत: जितेंद्र आव्हाडांना दिली आहे. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.
राहुल गांधी व्हिएतनामहून परतताच देशात सत्तापरिवर्तन; संजय राऊतांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
‘तुझ्या दारात आलोय, आत सोडायला सांग आणि आधी…गोळ्या घालेन’ अशी जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देणारा लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेत ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. विशाल माधवराव बिच्चेवाड असे धमकी देणाऱ्याचे नाव आहे. लोणीकंद पोलिसांनी त्याला आता ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. विशाल बिच्चेवाड हा सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून नोकरी करतो.
थोरल्या बेगमला शेवटी चोमडेपणा करावा लागला पण … जरांगेंचा रामदास कदमांवर हल्लाबोल
आमदार जितेंद्र आव्हाड यांना 19 ऑक्टोंबर रोजी रात्री 2 ते 3 वेळा फोन करुन आणि मेसेज पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘तुझ्या दारात आलोय, आत सोडायला सांग आणि आधी जित्याला गोळ्या घालेन’, असे म्हणत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
जिल्हा बँक बिनविरोधला ब्रेक? राम शिंदेंकडून कर्जत- जामखेड मधील उमेदवारांची यादी जाहीर
टिव्हीवरील न्यूजमध्ये ही बातमी घरमालकाने पाहिली. आपल्याकडे भाडेकरु म्हणून राहणाऱ्या विशाल याचेच हे काम असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने त्याला पकडून लोणीकंद पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर ठाणे पोलीस तातडीने लोणीकंद पोलीस ठाण्यात आले. त्यांनी विशाल बिच्चेवाड याला ताब्यात घेऊन नोटीस बजावली आहे.
