आज पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर, अनेक ठिकाणी वाहतूक मार्ग बंद

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर असून अनेक ठिकणी सर्वसामान्य लोकांसाठी असलेले मार्ग वाहतुकीसाठी बंद केले आहेत.

Modi In Mumbai

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर, अनेक ठिकाणी वाहतूक मार्ग बंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 17 फेब्रुवारी रोजी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. (Modi) त्यांच्या या दौऱ्यानिमित्त मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी 17 तारखेला दुपारी 2.15 वाजता मुंबईत पोहोचणार आहेत. त्यानंतर, दुपारी 2.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्यात लोकभवन (यापूर्वीचे राजभवन) येथे द्विपक्षीय बैठक पार पडणार आहे. दुपारी 5 वाजता नरेंद्र मोदी आणि मॅक्रोन यांची हॉटेल ताज येथे विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत राऊंडटेबल चर्चा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी 6.30 वाजता मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ परिसरात इंडो-फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी, व्हीव्हीआयपी नेतेमंडळींची उपस्थिती असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते वाहतूकीसाठी बंद राहणार आहेत.

मोदींनी नक्की काय केले की, ज्यामुळे महाराष्ट्र; भाजपच्या यशावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित भारत–फ्रान्स ‘इयर ऑफ इनोव्हेशन’ कार्यक्रमाच्या (14 ते 22 फेब्रुवारी 2026) आजच्या मुख्य कार्यक्रमात रस्त्यांवर वाहतूक कोंडीची शक्यता आहे. त्यामुळे आज दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत ही वाहतूक व्यवस्था लागू राहणार आहे. वाहन चालकांनी वाहतुकीच्या या बदलांची नोंद घेण्याचे आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आलं आहे.

कोणते मार्ग बंद राहणार?

दक्षिण मुंबईतील हे मार्ग राहतील बंद.

छत्रपती शिवाजी महाराज मार्ग बंद.

श्यामाप्रसाद मुखर्जी चौक बंद, फक्त आपत्कालीन वाहनासाठी हा मार्ग सुरु असेल.

नॉर्थ कोर्ट ते अॅडम स्ट्रीट जंक्शनपर्यंतचा पी. रामचंदानी मार्ग बंद .

रिगल जंक्शनकडे येणाऱ्या वाहनांना शहीद भगतसिंग मार्ग बंद.

महाकवी भूषण रोड बंद करत, बीके बोमन बेहराम रोडकडे वळवण्यात आले आहे.

पी. रामचंदानी मार्गावरील वाहतूक अल्वा चौक बंद.

रेडिओ क्लब बंद करत, हाजी नियाज आझम रोड आणि जगन्नाथ पालव चौक मार्गे वळवण्यात आली.

अॅडम स्ट्रीट आणि पी. रामचंदानी मार्गावरील टॅक्सी स्टँड आणि बेस्ट बसचे थांबे बंद राहणार.

हे सगळे वाहतुक नियम दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत बदल लागू राहणार.

Exit mobile version