मोठी बातमी! केंद्र सरकारची मोठी घोषणा, शिक्षण खात्याची जबाबदारी या बड्या नेत्याकडं

नवीन शिक्षणमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईपर्यंत जोशी या खात्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत.

News Photo   2026 07 25T203235.140

मोठी बातमी! केंद्र सरकारची मोठी घोषणा, शिक्षण खात्याची जबाबदारी या बड्या नेत्याकडं

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. (Pradhan) आज प्रधान यांनी त्यांच्याकडं असलेल्या शिक्षण खात्याच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. आता या खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे देण्यात आली आहे. नवीन शिक्षणमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईपर्यंत जोशी या खात्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सध्या प्रल्हाद जोशी यांच्याकडं सोपवण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी प्रल्हाद जोशी यांना त्यांच्या विद्यमान मंत्रालयांसोबतच शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा आदेश जारी केला आहे. यानुसार प्रल्हाद जोशी त्यांच्या विद्यमान जबाबदाऱ्यांसोबतच शिक्षण मंत्रालयाचं कामकाजही पाहणार आहेत. मात्र भविष्यात नवीन शिक्षणमंत्र्याच्या नावाची घोषणा झाल्यानंतर जोशी यांना या जबाबदारीतून मुक्त केलं जाणार आहे.

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींची पत्रकार परिषद; शिक्षण व्यवस्था, मोदी, शाह आणि RSS वर टीका

प्रल्हाद जोशी हे कर्नाटकातील धारवाड मतदारसंघाचे खासदार आहेत. सध्या ते ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा या मंत्रालयांचे केंद्रीय मंत्री आहेत. तसंच ते इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे अध्यक्षदेखील आहेत. आता पुढील काही काळ त्यांच्याकडं शिक्षण खात्याचीही जबाबदारी असणार आहे.

राजीनामा

धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा जाहीर करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या भविष्याचे रक्षण करणे आणि दिल्लीतील जंतर-मंतरवर तरुणांच्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या आंदोलनाचा फायदा देशविरोधी शक्तींना घेता येऊ नये, यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, केंद्र सरकार आणि कॉकरोच जनता पार्टी यांच्यातील तिसऱ्या फेरीच्या चर्चेच्या काही तास आधी हा राजीनामा देण्यात आला.

Exit mobile version