महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट, बंगालच्या उपसागरात मोठ्या घडामोडी, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत बरसणार पाऊस

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

Untitled Design   2026 10 26T082331.653

Untitled Design 2026 10 26T082331.653

Rain alert in Maharashtra :बंगालच्या उपसागरातील वातावरणीय बदलांमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातही होण्याची शक्यता असून, येत्या 27 ते 29 ऑक्टोबरदरम्यान राज्यातील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, 27 ऑक्टोबरपासून काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून, 28 ऑक्टोबरला गडचिरोली जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

27 ऑक्टोबर रोजी गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. 28 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील नऊ जिल्हे आणि घाट परिसरात पावसाची शक्यता आहे. यामध्ये गडचिरोली, कोल्हापूरचा घाट परिसर, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या भागांचा समावेश आहे.

गडचिरोली जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतर नमूद जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील काही भागांतही पावसाच्या सरी कोसळू शकतात. 29 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी, नाशिकचा घाट परिसर, पुण्याचा घाट परिसर, साताऱ्याचा घाट परिसर, जालना, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आल्याचे वृत्त आहे.

इतना टूटा हु कि छुने से बिखर जाऊंगा! अजितदादांच्या आठवणींनी गुलाबराव पाटील भावूक, शेरोशायरीतून दिला आठवणींना उजाळा

दरम्यान, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ते पश्चिम-वायव्य दिशेने सरकत असल्याचे वृत्त आहे. या हवामान प्रणालीची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात वाऱ्याचा वेग ताशी 90 ते 100 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच तामिळनाडू आणि पुद्दुचेरी परिसरात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

या बदलत्या हवामानाचा परिणाम देशातील विविध राज्यांवर होऊ शकतो. तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज आणि अलर्टमध्ये बदल होऊ शकत असल्याने नागरिकांनी हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे.

Exit mobile version