उद्धवजी 40 आमदार गेले, आता खासदार (Shivsena) गेले, पुढे निवडणुका आहेत आणखी काही लोक जातील. संजय राऊतांना आम्ही गांभिर्याने घेत नाही. आम्ही शिवसैनिक आहोत, तुम्ही तुडवायची काय भाषा करता. पण अंगावर आलात तर शिंगावर घेऊ. आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत. पण राऊत तझं तोंड बंद नाही केलं तर लोक तुझ्या घरात घुसून तुला तुडवतील असं म्हणत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर जोरदार प्रहार केला.
शिवसेनेच्या वाटचालीतील 57 वर्षाचा मी साक्षीदार आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढाणण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला. आज 60 वा वर्धापन दिन होत आहे. आज शिवसेना प्रमुख दोन दोन हातांनी एकनाथ शिंदेंना आशिर्दवाद देत असीतल. ते माझे विचार घेऊन पुढे घेऊन जात आहेत. त्यांचे विचार वाचवण्याचे काम एकनाथ शिंदेंनी केल्याचे कदम म्हणाले.
संजय राऊत तू शांत बसला नाही तर घरात घुसून, शिवसेना नेते रामदास कदमांकडून राऊंतावर थेट वार
मला डॉ. श्रीकांत शिंदेंचा अभिमान वाटतो. जेवढं तुमचं योगदान आहे, त्यापेक्षा श्रीकांत शिदेंचं अधिक योगदान आहे. त्यामुळं श्रीकांत शिंदेचं अभिनंदन. माझी आपणास विनंती आहे की श्रीकांत शिंदेंना युवासेनेचे प्रमुख करा, तसेच राष्ट्रीय सरचिटणीस करुन टाका असे रामदास कदम म्हणाले. आम्हाला आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावं लागायचं असे कदम म्हणाले.
संजय राऊतांमुळं उद्धव ठाकरेंना अधोगती सुरु झाली आहे. हे आपल्यासाठी चांगल आहे असे रामदास कदम म्हणाले. आमचा सह्याद्री हिमालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असं महणत रामदास कदम यांनी एखनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. वाघाच्या जबड्यात घालूनी हात, मोजीतो दात ही शिवसैनिकांची जात, असे म्हणत राऊत आमच्या नादी लागू नका असा इशारा रामदास कदम यांनी दिला. एकनाथ शिंदे दिवस रात्र काम करत आहेत असे कदम म्हणाले.
