Rohit Pawar Demands Action in Dr Rajendra Rupnawar Case: डॉ. राजेंद्र रुपनवर (Rajendra Rupnawar) यांच्या मृत्यूनंतर फलटण उपजिल्हा रुग्णालयातील कथित दबाव आणि वरिष्ठांकडून होणाऱ्या त्रासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रुपनवर यांनी जीवन संपवल्याच्या प्रकरणात माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे कथित पीए प्रसाद कोंडे देशमुख यांच्याकडून धमकी दिल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे.
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस; सरकारचं शिष्टमंडळ आज अंतरवालीत, तोडग्याची शक्यता?
रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असली तरी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
फिटनेस सर्टिफिकेटवरून वाद?
मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी प्रसाद कोंडे देशमुख हे फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात गेले होते. यावेळी त्यांनी आपण तानाजी सावंत यांचे पीए असल्याचे सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.
सर्टिफिकेट देण्याची निर्धारित वेळ संपल्यानंतरही तातडीने प्रमाणपत्र देण्याचा आग्रह देशमुख यांनी धरल्याचे सांगितले जाते. मात्र डॉ. रुपनवर यांनी नियमांचे कारण देत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. पुढे रुग्णालयातील वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्यानंतर देशमुख यांना प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती आहे.
आजपासून खिशाला झळ! दूध, CNG, रिक्षा-टॅक्सी महाग; जाणून घ्या आजपासूनचे नवे दर
या घटनेनंतर देशमुख यांनी डॉ. रुपनवर यांना धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या कथित वादामुळे डॉ. रुपनवर मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाले होते, असा दावा केला जात आहे. जीवन संपवण्याच्या प्रयत्नापूर्वी त्यांनी हातावर लिहिलेल्या कथित नोटमध्ये या घटनेचा उल्लेख केल्याचेही सांगितले जाते.
‘डॉक्टरांना जीवन संपवल्यास प्रवृत्त केलं जात असेल तर संतापजनक’
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करत या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांचे कथित पीए प्रसाद देशमुख यांच्याकडून धमकी आणि रुग्णालय प्रशासनाकडून त्रास दिल्याचा आरोप डॉ. रुपनवर यांनी केल्याचे त्यांनी नमूद केले.
याच रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे (Dr. Sampada Munde) यांनी मागील वर्षी जीवन संपवल्याचा उल्लेखही रोहित पवार यांनी केला. त्या प्रकरणाचा तपशील आणि त्यानंतर झालेल्या कारवाईबाबत अद्याप स्पष्टता नसताना डॉ. रुपनवर यांच्याबाबतही अशी घटना घडणे गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
डॉक्टर रुपनवरांचा मृत्यू; रुग्णालयातील वाद अन् मानसिक त्रासामुळे डॉक्टरांनी उचलले टोकाचे पाऊल?
डॉक्टर हे सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा डॉक्टरांवर मानसिक दबाव किंवा छळ होत असेल आणि त्यातून त्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाची सरकारने निष्पक्ष चौकशी करावी आणि तपासात दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर, त्यांचा राजकीय संबंध कोणताही असो, कठोर कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
