Sachin Sanap Pune Teachers Constituency Sangli Campaign: सांगली : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सचिन सानप यांच्या सांगली जिल्ह्यातील प्रचार दौरा उत्साहात झाला. सानप यांना जिल्ह्यातून शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, हा दौरा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
पहिल्या दिवशी सानप यांनी विविध शाळा, महाविद्यालयांना भेटी देत शिक्षक, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि शैक्षणिक संस्थांच्या संचालकांशी व्यापक संवाद साधला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते, विविध पक्षांचे पदाधिकारी, शिक्षक भारती संघटनेचे प्रतिनिधी आणि मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली.
सांगलीतील नामांकित वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स आणि वेलिंग्टन कॉलेजला सदिच्छा भेट देण्यात आली. या वेळी कॉलेजचे प्राचार्य, विभागप्रमुख आणि प्राध्यापकांशी जुळवून घेत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मकरंद अनासपुरेंनी सांगितल्या नाना पाटेकरांच्या आठवणी; पत्नीच्या आजारात गुरुजींनी कशी साथ दिली?
“शिक्षकांच्या हक्कांसाठी विधानपरिषदेत प्रभावी आवाज उठवण्यासाठी शिक्षकांचाच आमदार हवा,” असे सानप यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यातील शिक्षक बांधवांचे मिळालेले आत्मीय स्वागत, विश्वास आणि पाठिंबा यामुळे आपल्या पुढील प्रचाराला मोठी ऊर्जा मिळाल्याचे सानप यांनी या वेळी सांगितले. उपस्थित शिक्षकांनीही आपल्या अडीअडचणी मांडत सानप यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला.
