मोठी बातमी! शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना कॅन्सर; स्वत: दिली आजाराची माहिती

मला जेव्हा जेव्हा शक्य झालं तेव्हा मी बाहेर आलो. उभा राहिलो. अजून काही उपचार सुरु आहेत. काही सर्जरी व्हायच्या आहेत.

News Photo   2026 01 24T225904.777

मोठी बातमी! शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना कॅन्सर; स्वत: दिली आजाराची माहिती

शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Raut) हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. गेल्या वर्षी दिवाळीत त्यांना गंभीर आजाराचं निदान झालं होतं. त्यावेळी राऊत यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. गंभीर आजारी असल्याने काही काळ विश्रांती घेत असल्याचं ते म्हणाले होते. दरम्यान, आज एका वृत्त वाहिणीवर बोलताना राऊत यांनी स्वत: आपल्या आजाराची माहिती दिली आहे.

संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. तसेच त्यांच्यावर रुग्णालयात काही दिवस उपचार देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यानंतर संजय राऊत यांचा चेहऱ्यावर मास्क असलेला फोटो समोर आला होता. पण संजय राऊत यांना नेमकं कोणत्या आजाराने ग्रासलं आहे? ते सर्वसामान्य जनतेला माहिती नव्हतं. अनेकांना ज्या आजाराची शंका होती त्याच आजाराचं निदान संजय राऊत यांना झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुंबई महापौर पदासाठी तडजोड करु नका; दिल्ली नेतृत्वाचे भाजप नेत्यांना आदेश

नाही, मला कॅन्सर झाला ना? त्यात काय? दिवाळीच्या दोन-चार दिवस आधी कॅन्सरचं निदान झालं. माझे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी माझं रक्त चेक केलं. त्यातून ते निष्पन्न झालं की, मला पोटात कॅन्सर आहे. त्यातून आता मी बाहेर यायचा प्रयत्न करतोय. मला जेव्हा जेव्हा शक्य झालं तेव्हा मी बाहेर आलो. उभा राहिलो. अजून काही उपचार सुरु आहेत. काही सर्जरी व्हायच्या आहेत. पण त्या होतील. एवढ्या सर्जरी आपणही करतो. हे आपल्या शरीरातील सर्जरी आहे, अशी माहिती स्वत: राऊत यांनी दिली आहे.

आजारी असल्याचं समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. दरम्यानच्या काळात राऊत पुन्हा एकदा काही काळ रुग्णालयात उपचार घेत होते. आज ते सभा, कार्यक्रम अशा ठिकाणी उपस्थित असतात.

Exit mobile version