हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचं निधन की आत्महत्या?, कारमध्ये संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ

डॉ. मेहुल यांच्या पश्चात आई मीनाताई राठोड, पत्नी कॅन्सर सर्जन डॉ. प्रियंका राठोड आणि ६ वर्षांचा मुलगा, असा परिवार आहे.

News Photo   2026 07 15T213051.819

हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचं निधन; अंबाजोगाई महामार्गावर कारमध्ये संशयास्पद मृ्तदेह आढळला

प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड (DR) यांचा संशयास्पद मृ्त्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. डॉ. राठोड हे अंबाजोगाई महामार्गावर एका हॉटेलसमोर थांबलेल्या कारमध्ये प्रसिद्ध बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेत डॉ. मेहुल यांना जवळच्या फुलाबाई बनसोडे रुग्णालयात दाखल केलं. परंतु, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या या संशयास्पद मृत्यूने उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, कारमध्ये इंजेक्शन आढळून आलं असून, भुलीचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली असावी, असा अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूमागचं कारण स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले आहेत. डॉ. मेहुल राठोड हे मृदुभाषी, मनमिळावू आणि शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ, म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनाची वार्ता कळल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली. डॉ. मेहुल यांच्या पश्चात आई मीनाताई राठोड, पत्नी कॅन्सर सर्जन डॉ. प्रियंका राठोड आणि ६ वर्षांचा मुलगा, असा परिवार आहे.

विद्यार्थ्यांची आत्महत्या तरीही मोदींना पाझर फुटत नाही;अण्णांच्या आंदोलनाची आठवण करुन देत शेट्टींची टीका

नेमके कधी, काय घडले?

आज सकाळी 11 वाजल्यापासून डॉ. मेहुल राठोड घराबाहेर पडलेले होते. दरम्यान, दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास पत्नी डॉ. प्रियंका यांना डॉ. मेहुल हे रेणापूर रोडवर एका हॉटेलसमोर कारमध्ये बेशुद्धस्थितीत असल्याचं कळलं. त्यांनी तातडीने डॉ. मेहुल यांना रेणापूर मार्गावरील फुलाबाई बनसोडे रुग्णालयात दाखल केलं. साधारण 4:40 पर्यंत तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता, त्यांची नाडी लागली नाही. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली असल्याचं तेथील डॉक्टरांनी सांगितलं.

कारमध्ये इंजेक्शन

उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे म्हणाले, रेणापूर मार्गावर खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोर एका हॉटेलसमोर त्यांची कार उभी आहे. घटनास्थळाचा पंचनामा सुरू असून, तिथे काही इंजेक्शन सापडले आहेत. परंतु, ते त्यांनी घेतले की नाही, हे स्पष्ट नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागचे कारण स्पष्ट होईल. दरम्यान, आत्महत्या की नैसर्गिक मृत्यू, याची अद्यापि नोंद झालेली नाही.

Exit mobile version