आता फक्त कॉलिंग आणि SMS साठी मिळणार रिचार्ज; TRAIचा टेलिकॉम कंपन्यांना मोठा आदेश

Mobile Data : डेटा वापरत नसलेल्या ग्राहकांसाठी आता केवळ कॉलिंग आणि SMS सुविधांचे स्वतंत्र रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा.

News Photo   2026 09 22T144842.244

Mobile Data Update

मोबाईलमध्ये इंटरनेट डेटा वापरत नसलेल्या (Mobail) ग्राहकांसाठी आता केवळ कॉलिंग आणि SMS सुविधा असलेले स्वतंत्र रिचार्ज प्लॅन उपलब्ध होणार आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) 22 सप्टेंबर 2026 रोजी यासंदर्भात नवे नियम जारी केले आहेत. या निर्णयामुळे प्रत्येक रिचार्जसोबत डेटा घेण्याची गरज नसलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

TRAIच्या नव्या नियमानुसार, टेलिकॉम कंपन्यांना केवळ व्हॉइस कॉल आणि SMS सेवा देणारे Special Tariff Vouchers (STV) उपलब्ध करून द्यावे लागतील. या प्लॅनमध्ये मोबाइल डेटा देणे बंधनकारक राहणार नाही. त्यामुळे इंटरनेटचा वापर न करणारे ज्येष्ठ नागरिक, फीचर फोन वापरणारे तसेच मर्यादित गरजा असलेल्या ग्राहकांना आपल्या वापरानुसार रिचार्ज निवडता येणार आहे.

1 सप्टेंबरपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मोठा बदल; मोबाईलवरील ई-बोर्डिंग पासवरच इमिग्रेशन क्लिअरन्स

विशेष म्हणजे, अशा व्हॉइस आणि SMS-only प्लॅनची वैधता 365 दिवसांपर्यंत असू शकते. TRAIच्या अधिकृत माहितीनुसार, हे प्लॅन डेटा नसलेले प्रीपेड पर्याय असतील. त्यामुळे ग्राहकांना कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी स्वतंत्र पर्याय मिळणार आहे.

याआधीही Jio, Airtel आणि Vodafone Idea (Vi) यांनी डेटा नसलेले व्हॉइस आणि SMS प्लॅन उपलब्ध केले होते. मात्र, 2026 मध्ये TRAIने अशा पर्यायांची उपलब्धता अधिक व्यापक करण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. एप्रिलमध्ये TRAIने प्रत्येक वैधता कालावधीसाठी अशा प्लॅनचा विस्तार करण्याचा प्रस्ताव मांडला होता.

या निर्णयाचा मुख्य उद्देश ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार रिचार्ज निवडण्याचे अधिक स्वातंत्र्य देणे हा आहे. ज्यांना इंटरनेटची आवश्यकता नाही, अशा ग्राहकांना डेटा असलेल्या महागड्या बंडल प्लॅनऐवजी केवळ आवश्यक सेवांसाठी पैसे खर्च करता येतील.

Exit mobile version