Travel between Beed and Pune to become easier : बीडकरांसाठी पुण्याचा प्रवास आता आणखी सोपा आणि सुविधाजनक होणार आहे. बीड-पुणे एक्स्पप्रेस रेल्वेसेवेबाबत महत्वाची माहिती समोर आली असून या गाडीच्या विविध प्रवर्गातील तिकीट दरांची माहिती बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. बीड आणि पुणे या दोन शहरांना थेट रेल्वेने जोडणाऱ्या या सेवेमुळे मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
बीड-पुणे एक्सप्रेसचा गाडी क्रमांक 11433/11434 असा आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार बीड ते पुणे प्रवासासाठी जनरल तिकीट 120 रुपये असणार आहे. स्लीपर क्लाससाठी 450 ते 480 रुपये तर एसी थ्री टियरसाठी 520 ते 665 रुपये भाडे नमूद करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे एसी तू टियरसाठी 725 ते 760 रुपये तिकीट दर देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार वेगवेगळ्या श्रेणींमधून प्रवासाचा पर्याय उपलब्द्ध होणार आहे.
मात्र, या रेल्वेचं ऑनलाईन तिकीट बुकींबाग अद्याप सुरू झालेलं नाही. ही बाब प्रवाशांनी लक्षात घेणं महत्वाचं आहे. माहितीपत्रकानुसार नियमित रेल्वे सेवा आठवडाभरात सुरू करण्याची शक्यता आहे. नियमित सेवा सुरू झाल्यानंतर अंतिम तिकीट दर निश्चित होतील. त्यामुळे सध्या जाहीर करण्यात आलेल्या दरांमध्ये पुढे बदल होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
1400 कोटींची सिंचन कामं स्थगित, जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप
तिकीट आरक्षणाची सुविधा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना संगणकीकृत पिआरएस तिकीट केंद्रावर तसेच आयआरसीटीसीच्या माध्यमातून आरक्षण करता येणार आहे. त्यामुळे बीडहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना तिकीट आरक्षणासाठी नियमित रेल्वे आरक्षण प्रणालीचा वापर करता येईल. बीड-पुणे थेट रेल्वे सेवा ही विशेषतः विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि नियमितपणे पुण्याला ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची ठरणार आहे.
आतापर्यंत रस्तेमार्गासह इतर पर्यायांवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना आता थेट रेल्वे प्रवासाचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बीड आणि पुणे या दोन शहरांमधील दळणवळण अधिक सोपे होण्यास मदत होईल. बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलेल्या सोशल मीडिया पोस्टच्या आधारे ही माहिती देण्यात आली आहे. आता बीड-पुणे एक्सप्रेसची नियमित सेवा नेमकी कधी सुरू होते, ऑनलाईन आरक्षण कधी उपलब्ध होतं आणि अंतिम तिकीट दर काय निश्चित केले जातात, याकडे प्रवाशांचा लक्ष लगल आहे.
