UBT Splite MP Sanjay Raut Criticize MP who join Shivsena : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फुटले आहेत. त्यात ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का तो धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रविवारी शिंदे गटात प्रवेश करण्याची घोषणा केली त्यामुळे. त्यानंतर आजच या 6 फुटलेल्या खासदारांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे खासदार मुंबईत पोहचले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या सहा खासदारांवर जोरदार टीका केली.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
50 50 कोटीला विकले गेलेले चार खासदार मुंबई विमानतळावर उतरले आणि भेदरलेल्या नजरेने शशस्त्र पोलिस गराड्यात बाहेर पडले.
ये जिना भी क्या जिना है लल्लू? चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे! ह्यांची पुढील पिढी सांगेल, मेरा बाप गद्दार था, मेरा पती गद्दार था, मेरा नाना गद्दार था! जय महाराष्ट्र!
50 50 कोटीला विकले गेलेले चार खासदार मुंबई विमानतळावर उतरले
आणि भेदरलेल्या नजरेने
शशस्त्र पोलिस गराड्यात बाहेर पडले
ये जिना भी क्या जिना है लल्लू?
चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे!
ह्यांची पुढील पिढी सांगेल
मेरा बाप गद्दार था
मेरा पती गद्दार था
मेरा नाना…— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2026
बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फुटल्यानंतर गेले 2-3 दिवस राज्यामध्ये राजकीय नाट्य सुरू होतं. या नाट्यावर आज अखेर पडदा पडला आहे. कारण आज 22 जून 2026 रोजी अखेर ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांनी शिंदेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील वायबी सेंटरमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे.
